Pathaan | ‘पठाण’चं प्रमोशन का नाही केलं? अखेर शाहरुख खानने दिलं उत्तर

पठाणच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी कोणत्याच माधम्यांना मुलाखत दिली नव्हती किंवा कोणत्याही शोमध्ये त्यांनी हजेरी लावली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने चित्रपट प्रदर्शित न करण्यामागचं कारण सांगितलं.

Pathaan | 'पठाण'चं प्रमोशन का नाही केलं? अखेर शाहरुख खानने दिलं उत्तर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 5:58 PM

मुंबई: बॉलिवूडमधील एखाद्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटाचं प्रमोशन असेल, तर ते धूमधडाक्यात आणि कोट्यवधी रुपये खर्चून झालंच पाहिजे, असं मानलं जातं. अत्यंत हटके प्रमोशन करून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचं काम आजवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चित्रपटांनी केलं आहे. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे ‘पठाण’ या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार होणार, असा चाहत्यांना अंदाज होता. मात्र याउलट शाहरुखने काहीच प्रमोशन न करण्याचं ठरवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने फक्त दोन-तीन वेळा ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखने पठाणचं प्रमोशन का नाही केलं, याचं उत्तर अखेर समोर आलं आहे.

पठाणच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी कोणत्याच माधम्यांना मुलाखत दिली नव्हती किंवा कोणत्याही शोमध्ये त्यांनी हजेरी लावली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने चित्रपट प्रदर्शित न करण्यामागचं कारण सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘कोणत्याही प्रमोशनशिवाय, प्रदर्शनापूर्वी माध्यमांना मुलाखती दिल्याशिवायही पठाणची डरकाळी बॉक्स ऑफिसवर जोरात ऐकायला मिळत आहे’, असं एका युजरने लिहिलं. त्यावर शाहरुखने लिहिलं, ‘मी विचार केला की सिंह इंटरव्ह्यू करत नाहीत, म्हणून यावेळी मीसुद्धा करणार नाही. फक्त जंगलात येऊन पहा.’

पठाणने अवघ्या चार दिवसांत 429 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 265 कोटी आणि परदेशात 164 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.