Shah Rukh Khan: ‘थोडी तरी लाज बाळग…’, किंग खानने सर्वांसमोर वृद्ध व्यक्तीलादिला धक्का, व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan Viral Video: सोलो पोजसाठी शाहरुख खान याने सर्वांसमोर वृद्ध व्यक्तीला दिला धक्का... व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी साधल किंग खानवर निशाणा, सध्या सर्वत्र शाहरुख खान याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे...

Shah Rukh Khan: थोडी तरी लाज बाळग..., किंग खानने सर्वांसमोर वृद्ध व्यक्तीलादिला धक्का, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Aug 12, 2024 | 11:02 AM

बॉलिवूडचा किंग खान अर्थान अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 2023 मध्ये तब्बल 4 वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने ‘पठाण’ सिनेमातून पुन्हा पदार्पण केलं आणि एक इतिहास रचला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र अभिनेत्याची चर्चा होती. नुकताच, स्वित्झर्लंडमधील 77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखने चित्रपट महोत्सवात आपल्या भाषणाने लोकांची मनं जिंकली. पण त्याचवेळी व्हायरल झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहून लोक शाहरुखवर टीका करत आहेत. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान एका वृद्ध व्यक्तीला धक्का देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सोलो पोज देण्याआधी शाहरुख एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या दोन्ही हातांनी मागे ढकलतो.

व्हिडीओ पाहिल्यानंतर विनोदी अंदाजात शाहरुख व्यक्तीला मागे ढकलतो. पण सोशल मीडियावर अनेकांनी किंग खानवर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्या एक्सवर शाहरुख खानचा व्हिडीओ पोस्ट केले आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘शाहरुख खान याने एका वृद्ध व्यक्तीला धक्का मारला… थोडी तरी लाज वाटली पाहिजे..’

अनेकांना शाहरुख खानला ट्रोल केलं. ‘मला माहिती आहे तो योग्य व्यक्ती नाही. फक्त चांगला असल्याचा देखावा करतो.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मी शाहरुख खानची फार मोठी चाहती आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर मी प्रचंड नाराज झाली आहे.’, ‘नाण्याला दोन बाजू असतात आणि एक बाजू दिसत आहे…’ सध्या सोशल मीडियावर किंग खानच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान याचे सिनेमे

शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने गेल्या वर्षी तीन सुपरहीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. आता अभिनेता ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान पहिल्यांदा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.