
Aryan Khan Lifestyle: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान सध्या त्याची पहिली वेबसीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मुळे तुफान चर्चेत आहे. सध्या आर्यन खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहेत. सीरिजचा प्रीव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये किंग खानच्या कुटुंबासोबतच सीरिजमधील अन्य कास्ट देखील उपस्थित होती. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र आर्यन खान याची चर्चा सुरु आहे. आर्यन खान याच्या आलिशान आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.
आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला. आर्यन याने सुरुवातीचं शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथे पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो परदेशात गेला. त्याने सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातून सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शनमध्ये ललित कला विषयात पदवी पूर्ण केली.
आर्यन खान याने आता दिग्दर्शन विश्वात पदार्पण केलं आहे. पण व्यवसाय क्षेत्रात आर्यन पूर्वीपासून कार्यरत आहे. आर्यन याने त्याच्या मित्रांसोबत 2022 मध्ये D’YAVOL ची स्थापना केली. हा एक स्ट्रीटवेअर लाइफस्टाइल ब्रँड आहे. त्याचे कपडे खूप महाग आहेत. याद्वारे आर्यन खूप कमाई करतो. याशिवाय आर्यनचा एक प्रीमियम स्कॉच व्हिस्की ब्रँड देखील आहे. त्याचं नाव डी’याव्होल इंसेप्शन आहे. तो त्याचे वडील शाहरुखसोबत मिळून हा व्यवसाय करतो.
आर्यन खान याला महागड्या कारचा शोक आहे. लहान वयात आर्यन खान याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. आर्यन खान याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज GLS 350D, मर्सिडीज GLE 43 AMG कूप, BMW 730 LD आणि ऑडी A6 सारख्या कारचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार, आर्यन खानकडे 80 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आर्यनचं दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये एक आलिशान घर देखील आहे. त्याची किंमत सुमारे 37 कोटी रुपये आहे. आर्यन व्यवसायाव्यतिरिक्त सोशल मीडिया आणि ब्रँड शूटमधूनही भरपूर कमाई करतो.