Sohail Khan: 24 वर्ष एकत्र राहिलो पण…, घटस्फोटावर पहिल्यांना बोलला सोहेल खान
Sohail Khan on Divorce: लग्नाच्या 24 वर्षांनंतर का विभक्त झाले सोहेल खान आणि सीमा सजदेह, घटस्फोटानंतर पूर्व पत्नीबद्दल कसा विचार करतो सोहेल.... नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाला...

Sohail Khan on Divorce: अभिनेता आणि दिग्दर्शक सोहेल खान याने 2022 मध्ये पूर्वी पत्नी सीमा सजदेह हिच्यासोबत घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. पण घटस्फोटानंतर देखील सोहेल आणि सीमा मुलांचा योग्या प्रकारे सांभाळ करत आहेत. शिवाय खान कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात सीमा असते. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोहेल खान याने घटस्फोटावर आणि सीमा हिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सोहेल व्यक्त झाला आहे…
सोहेल खान म्हणाला, लग्नानंतर 24 वर्ष सीमा आणि सोहेल एकत्र राहिले. सीमा एक चांगली मुलगी आहे… आणि काही गोष्टी खटकला पण सीमा सोहेल यांच्या नात्यात कोणते बदल झाले नाहीत. पुढे सोहेल म्हणाला, ‘सीमा एक प्रेमळ आणि काळजी करणारी आई आहे… घटस्फोटानंतर आम्ही निर्णय घेतला होता की, मुलांना कधीच अंतर देणार नाही… प्रत्येक वर्षी एक कुटुंब म्हणून फिरायला जाऊ, ज्यामुळे आम्ही वेगळे आहोत अशी भावना मुलांच्या मनात येणार नाही… आम्ही विभक्त झालो असलो तरी मुलांवर प्रचंड प्रेम आहे…’
घटस्फोटाच्या कारणाबद्दल सांगताना सोहेल म्हणाला, ‘आई – वडिलांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे मुलांचं भविष्य खराब होतं. त्यांच्या मानसिक स्थितीवर घात होतो… अशात मोठे झाल्यानंतर ते कायम त्रासलेले राहतात… हे सर्व आमच्या मुलांसोबत व्हावं असं आम्हाला बिलकूल वाटत नव्हतं… त्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला… आजही सीमासाठी मनात आदर आहे…’
लग्नाच्या 24 वर्षांनंतर विभक्त झाले सीमा आणि सोहेल
सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण आहे तर, लहान मुलाचं नाव योहान आहे… 24 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सीमा आणि सोहेल यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केली.
घटस्फोटानंतर सीमाच्या आयुष्यात परतलं प्रेम…
सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर सीमा सध्या कोट्यधीश बिझनेसमन विक्रम अहुजाला डेट करतेय. विशेष म्हणजे 1998 मध्ये सोहैलशी पळून जाऊन लग्न करण्याआधी सीमाचा याच विक्रमसोबत साखरपुडा झाला होता. आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाल्यानंतर सीमा म्हणाली, ‘आयुष्यात एकटं राहणं खूप कठीण आहे आणि सिच्युएनशनशिपमुळे मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. अशा बाबतीत मी जरा जुन्या विचारांची आहे. मला रिलेशनशिपच्या या मॉडर्न संकल्पना पटत नाहीत. मी तशी व्यक्ती नाही. मला कॅज्युअल नाती आवडत नाहीत. जर मी एखाद्या व्यक्तीमध्ये माझा वेळ गुंतवत असेन तर मी माझे सर्व प्रयत्न करते…’ असं देखील सीमा म्हणाली होती.
