कर्म भोगावे…, शेवटच्या क्षणी कशी होती राजेश खन्ना यांची अवस्था, कुटुंबियांनी संपूर्ण मालमत्ता घेतली आणि…
Rajesh Khanna : कठीण दिवसांत कुटुंबियांनी सोडली राजेश खन्ना यांची साथ, ताब्यात घेतली सर्व मालमत्ता, शेवटच्या क्षणी कशी होती त्यांची अवस्था, कोणी केला इतका मोठा खलासा?

Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 18 जुलै 2012 मध्ये अखेरचा श्वास घेतला. तेव्हा राजेश खन्ना 69 वर्षांचे होते. पत्नी, मुली, जावई… असं संपूर्ण कुटुंब असताना शेवटच्या क्षणी त्यांना कुटुंबियांची साथ मिळाली नाही. पत्नी डिंपल कपाडिया यांनी साथ सोडल्यानंतर राजेश खन्ना यांनी अनिता आडवाणी यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं आणि 12 दोघे एकत्र राहिले. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनिता यांनी राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल आणि त्यांच्या संपत्तीबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
जेव्हा अनिता हिला विचारण्यात आलं की, कुटुंब असताना देखील त्यांच्या कुटुंबाने त्यांची साथ का नाही दिली. यावर अनिता म्हणाली, ‘डिंपल हिने राजेश यांना 1982 साली सोडलं होतं. त्यानंतर 30 वर्ष दोघांमध्ये कोणतेच संबंध नव्हते. तेव्हापर्यंत राजेश खन्ना यांनी सर्वकाही गमावलं होतं. ते मध्ये अडकले होते. त्यांना घटस्फोट देखील मिळणं शक्त नव्हतं. त्यामुळे कोणताच पर्याय उरलेला नव्हता…
कुटुंबाला सर्व संपंत्ती मिळाली…
अनिता म्हणाली, अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर देखील माझ्याकडे काहीही राहिलं नाही… शेवटच्या क्षणी त्यांनी कोणतीच शुद्ध नव्हती. सर्व काही अशा प्रकारे घडले की सर्वकाही पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलं… कोणाच्याही आवाक्याबाहेर, अगदी त्यांच्या स्वतःच्याही. तरी सुद्धा कुटुंबाला सर्व संपत्ती मिळाली. हे देखील एक मोठं रहस्य आहे…’ संपत्ती प्रकरणी अद्यापही कोर्टात सुनावनी सुरु आहे… असं देखील अनिता म्हणाली.
कर्म भोगावेच लागतील…
लोभ आणि विश्वासघात यावर बोलताना अनिता म्हणाली, ‘जाताना कोणीच काहीही घेऊन जात नाही. तर मग अशी फसवणूक का? मेल्यानंतर कोणी खाऊ शकत नाही किंवा सोबत घेऊन जावू शकत नाही… असं असताना एवढा लोभ कशासाठी? प्रत्येत नात्यामझ्ये सन्मान महत्त्वाचा आहे… प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार मिळाले पाहिजे. कर्माचं फळ आपोआप मिळतं. तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजत असलात तरी, कोणीच कर्मापासून सुटू शकत नाही.” असं देखील अनिता म्हणाली.
अनिता असंही म्हणाली की, ती राजेश खन्ना यांच्या आयुष्यात डिंपल कपाडियाशी लग्न करण्यापूर्वीही होती. पण त्या सुपरस्टारशी लग्न करू शकल्या नाहीत. पण त्यानंतर घरातील मंदिरासमोर त्यांनी गुपचूप लग्न केलं. अनिता कायम खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असते. दोघांचे अनेक फोटो देखील समोर आले आहेत.
