शाहिद कपूरच्या आईचं 3 अयशस्वी लग्नांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘मी अशा पुरुषांसोबत लग्न केलं, ज्यांच्याकडे पैसा…
'मी अशा पुरुषांसोबत लग्न केलं, ज्यांच्याकडे पैसा...', एक - दोन नाही तर, तीन अयशस्वी लग्नांबद्दल शाहिद कपूर याच्या आईचं मोठं वक्तव्य..., सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

अभिनेता शाहिद कपूर याची आई आणि अभिनेत्री नीलिमा आझीम यांनी एका मुलाखतीत त्यांच्या तीन अयशस्वी लग्नांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नीलिमा म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर लोक सत्य माहिती नसताना काहीही बोलतात.’ सांगायचं झालं तर, नीलिमा यांनी पहिलं लग्न पंकज कपूर, दुसरं लग्न राजेश खट्टर आणि तिसरं लग्न उस्ताद रजा अली खान यांच्यासोबत केलं. पण नीलिमा यांची तिनही लग्न अयशस्वी ठरले. अशात एका मुवाखतीत नीलिमा म्हणाल्या, ‘मी माझ्या आयुष्यात आता फार पुढे गेली आहे… पण आजही लोक मला सोशल मीडियावर ट्रोल करत असतात.’
‘आताच काही दिवसांपूर्वी कोणी एकाने कमेंट केली होती की, पाहा दारु पिऊन काय अवस्था झाली आहे. मी तर दारु पीत देखील नाही… लोकांना आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नसतं. पण त्यांना चर्चा आणि ट्रोल करायचं असतं.’, यावेळी नीलिमा त्यांच्या तीन लग्नांबद्दल देखील म्हणाल्या, ‘मी कायम साधारण पुरुषांसोबत लग्न केलं… ज्यांच्याकडे पैसा नव्हता… पण मला असं वाटतं की, मी चांगल्या आणि टॅलेंटेड पुरुषांसोबत लग्न केलं आहे. मी कधीच पैशांसाठी लग्न केलं आहे… मी माझ्या आयुष्यात कधीत अशी नाती बनवली नाही, जे माझ्या करियरमध्ये माझी मदत करतील. व्यवसायात माझ्यासाठी पैसा लावतील… हाच माझा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे… मी कायम माझ्या क्षमतेनुसार निर्णय घेतले आहेत… मी कधी थिएटर केलं, तर कधी टीव्हीसाठी काम केलं. होस्टिंग केली, डान्स केला… एका अभिनेत्री म्हणून मला 27 ‘बेस्ट एक्ट्रेस’चे पुरस्कार मिळालेले आहेत. मी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे…’
पुढे नीलिमा म्हणाल्या, ‘जर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाजू मांडली नाही तर, सोशल मीडियावर असंख्य लोक तुमची बदनामी करण्यासाठी बसले आहेत. पण आता मला असं वाटतं की, मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे, जिथे मला बोलायला हवं… जर तुम्ही तुमचं सत्य सांगितलं नाही तर, तुम्हाला मागे कुठेतरी दाबलं जातं आणि जे सत्य आहे, त्याला तोडून – मोडून सांगितलं जातं. वेळ जाते, तसं कळू लागतं की, तुमची बदनामी होत आहे… दुःखाची गोष्ट म्हणजे हे सर्व दुसरी महिलाच करत आहे… महिलाच एकमेकींसोबत असं करतात? मला माझं वैवाहिक आयुष्य संपवायचं नव्हतं. पण आयुष्यात काही घटना अशा घडतात, जेव्हा तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यावाच लागतो…’ असं देखील नीलिमा म्हणाल्या.
एवढंच नाही तर, 2021 दिलेल्या एका मुलाखतीत नीलिमा यांनी दुसरे पती राजेश खट्टर यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझं दुसरं लग्न टिकलं असतं, जर काही गोष्टी घडल्या नसत्या… ज्यांचा सामना करणं देखील फार कठीण होतं… सर्वकाही अशक्य वाटत होतं… मला असं वाटतं, जर दुसऱ्या लग्नात थोडं नियंत्रण, समजदारी आणि लॉजीक असतं, तर दुसरं लग्न टिकलं असतं. पण असं झालं नाही. कधी – कधी लोक दबावाखाली येऊन हार मानतात. पण मी तसं केलं नाही, मी पुन्हा त्याच हिंमतीने उभी राहिली. माझ्या आयुष्यात माझी दोन मुलं आहेत (शहिद आणि इशान). माझी मुलंच माझ्यासाठी प्रेरणा आहेत.. असं देखील नीलिमा अझीम म्हणाल्या…