AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 23 व्या वर्षी पतीचं निधन, अभिनेत्रीचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, आता जगतेय ‘असं’ आयुष्य

Love Life | प्रेमविवाह... पण पतीने वयाच्या 23 व्या वर्षी सोडली साथ, पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीने स्वतःला देखील संपवण्याचा केला प्रयत्न... आता जगतेय असं आयुष्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

वयाच्या 23 व्या वर्षी पतीचं निधन, अभिनेत्रीचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, आता जगतेय 'असं' आयुष्य
| Updated on: Mar 30, 2024 | 12:21 PM
Share

झगमगत्या विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. अभिनेत्रींचं खासगी आयुष्य कसं आहे. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेक अभिनेत्री त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. पण काही अभिनेत्री मात्र त्याचं खासगी आयुष्य गुपित ठेवतात. अशाच अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याचं सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. सांगायंचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान याची अभिनेत्री विद्या माळवदे हिच्यासोबत देखील मोठी धक्कादायक घडना घडली. विद्या फक्त 23 वर्षांची असताना तिच्या पतीचं निधन झालं.

विद्या हिला प्रोफेशनल आयुष्यामध्ये यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र विद्या हिने अनेक संकटांचा सामना केला. 2000 हे वर्ष विद्यासाठी प्रचंड वेदनादायी होतं. कारण अभिनेत्रीचे पती कॅप्टन अरविंद सिंग यांचं विमान अपघातात निधन झालं. तेव्हा अभिनेत्री फक्त 23 वर्षांची होती. अरविंद आणि विद्या यांचा प्रेमविवाह होता.

पतीच्या निधनानंतर विद्या पूर्णपणे कोलमडली होती. एवढंच नाहीतर, पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा देखील निर्णय घेतला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, विद्याने हिने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं. जेव्हा अभिनेत्रीच्या पतीचं निधन झालं, तेव्हा ती जर्मनी याठिकाणी होती.

पतीच्या निधनाच्या दोन – तीन दिवसांनंतर अभिनेत्रीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मेडिटेशन आणि योगा करण्यास सुरुवात केली. आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत अभिनेत्री पुन्हा रि-स्टार्ट करत आयुष्याला नव्याने सुरुवात केली.

विद्या माळवदे हिचं दुसरं लग्न…

विद्या माळवदे हिने 2009 मध्ये दिग्दर्शक संजय दायमा याच्यासोबत लग्न केलं. पण विद्याने दिग्दर्शकाला लग्नासाठी होकार द्यायला दोन वर्षांचा काळ घेतला. आता अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदी आहे. विद्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या माळवदे हिची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, विद्या हिने अभिनेता शाहरुख खान याच्या ‘चक दे ​​इंडिया’ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. नुकताच विद्या ‘मिसमॅच्ड’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.