
Shah Rukh Khan son Aryan Khan : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजनंतर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे… आर्यन याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कौर बेंगळुरूमधील एका पबमध्ये आर्यन खान जनतेला मिडल फिंगर दाखवताना दिसत आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, एका वकिलाने आर्यन खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वकिलाने त्याच्याविरुद्ध अश्लील वर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी आर्यन खान एका खाजगी पार्टीसाठी बेंगळुरूला गेला होता. यादरम्यान, तो अशोक नगर पोलिस स्टेशनजवळील एका पबमध्ये दिसला. पबमधूल मिडल फिंगर दाखवतानाचा आर्यन याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन, कन्नड अभिनेता झैद खान, गृहनिर्माण आणि वक्फ मंत्री जमीर अहमद खान यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते मोहम्मद नालापद यांच्यासोबत दिसत होता. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एनए हरिस यांच्या मुलासह बेंगळुरूमधील एका पबमध्ये दिसला.
Actor #ShahRukhKhan’s son #AryanKhan recently visited #Bengaluru. He had come to the city for a private event but ended up causing controversy.
Fans had gathered at a pub to see him, and during this time, he showed his middle finger in public.
A video of the incident has gone… pic.twitter.com/HfRIgrLapK
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 4, 2025
आर्यन खान याचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये आर्यन सुरुवातील आनंदाने चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. त्यानंतर तो मिडल फिंगर दाखवायला सुरुवात करतो… आर्यन खान याच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात बेंगळुरू पोलीस पबमध्ये पोहोचले आणि त्याच्या मॅनेजरची चौकशी केली.
आर्यन खान जामिनावर आहे बाहेर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 28 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील अशोकनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका लोकप्रिय पबमध्ये घडली. या घटनेबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
सांगायचं झालं याआधी देखील आर्यन खान वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. 3 ऑक्टोबर 2021 रोजी, एका क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यनला इतर सहा जणांसह अटक केली होती. मुंबई मध्यवर्ती कारागृहात 25 दिवस घालवल्यानंतर आणि चार वेळा जामीन नाकारल्यानंतर, 28 ऑक्टोबर 2021 रोजी किंग खान याच्या जामीन मंजूर करण्यात आला.