“व्हिडीओ कॉल,मग मला घरी बोलावलं…”; शाहरुख खानसोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, महिलेची पोलिसांत तक्रार

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. शुटींगच्या बहाण्याने घरी बोलावून हे कृत्य केल्याचा आरोप एका 32 वर्षीय महिलेने केला आहे. तसेच खार पोलिसांत तिने तक्रारही दाखल केली आहे.

व्हिडीओ कॉल,मग मला घरी बोलावलं...; शाहरुख खानसोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, महिलेची पोलिसांत तक्रार
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 6:55 PM

बॉलिवूड अभिनेता शरद कपूरवर एका ३२ वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्याने कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

महिलेला घरी बोलावले रिपोर्टनुसार,अभिनेत्याची आणि महिलेची सोशल मीडियावर मैत्री झाली. यानंतर अनेकदा सोशल मीडियावरच हे दोघे बोलत असायचे. त्यानंतर एकदा त्यांचे व्हिडिओ कॉलवरही बोलणे झाले. त्यावेळी शरदने त्या महिलेला सांगितले की, मला शूटिंगबाबत तिच्याशी बोलायचे आहे. त्यासाठी त्याने तिला कार्यालयात ये म्हणून सांगितले.

खार येथील कार्यालयाचा पत्ताही तिला देण्यात आला. मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते शरदचे कार्यालय नसून त्यांचे घर असल्याचे महिलेला समजले. यासगळ्या प्रकरणाचा खुलासा महिलेने स्वत: केला आहे.

अश्लील मेसेज पाठवून त्रास दिल्याचा आरोप 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ती महिला अभिनेता शरदच्या घरी पोहोचली तेव्हा तिला तिसऱ्या मजल्यावर बोलावण्यात आले आणि एका व्यक्तीने दरवाजा उघडला. यानंतर शरदने तिला आतून बोलावून बेडरूममध्ये यायला सांगितले. आणि तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

एवढच नाही तर शरदने संध्याकाळी तिला अश्लील मेसेज पाठवून त्रास दिल्याचेही महिलेने सांगितले. पीडितेने तिच्या जवळच्या मैत्रिणीला या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर खार पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

अद्याप तरी अभिनेत्याची कोणतीच प्रतिक्रिया नाही 

या महिलेने 27 नोव्हेंबर रोजी खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र याप्रकरणी शरद कपूरने कोणतेही वक्तव्य किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या बातमीने सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.तसेच पुन्हा एकदा या मायावी दुनिया असलेल्या ‘फिल्म इंडस्ट्रीतील’ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

शरद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास शरदने ‘तमन्ना’, ‘दस्तक’, ‘त्रिशक्ति’, ‘जोश’ आणि ‘इसकी टोपी उसके सार’ या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. शरदची ओळख झाली ती ‘जोश’ या चित्रपटामुळे. लोक त्याच्या अभिनयाचे आजही कौतुक करतात, पण आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरील आरोपांमुळे चर्चेत आला आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 74, 75 आणि 79 अंतर्गत अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.