AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Bapat: सीन संपल्यानंतरही तो किस करत राहिला अन्… प्रिया बापटने सांगितला सेटवरचा धक्कादायक अनुभव

Priya Bapat: अभिनेत्री प्रिया बापटने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करताना आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. एक अभिनेता कट म्हटल्यानंतरही प्रियाला किस करत होता. आता नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या...

| Updated on: May 18, 2026 | 5:40 PM
Share
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने वेबसीरिज जगतात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रियाला एका अत्यंत भयानक आणि धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका सहकलाकाराने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारताना या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा खुलासा केला.

1 / 6
प्रियाने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना तिला कधीही कोणताही वाईट अनुभव आला नाही. मात्र हिंदीत पदार्पण करताना तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने तिची मोठी कोंडी झाली होती. या मुलाखतीत तिने त्या अभिनेत्याचे नाव घेणे टाळले, पण बाजूला बसलेली सई ताम्हणकर म्हणाली, "मला बहुधा माहिती आहे तो कोण आहे."

2 / 6
"कथानकानुसार चित्रपटात फक्त एकच किसिंग सीन होता. मला वैयक्तिकरित्या त्याची गरज वाटत नव्हती, म्हणून मी दिग्दर्शकाशीही चर्चा केली होती. पण त्यांचा प्रचंड आग्रह असल्याने मी शेवटी होकार दिला. मात्र, प्रत्यक्ष शूटिंग सुरू झाल्यावर त्या सहअभिनेत्याने मर्यादा ओलांडल्या. सीन संपल्यानंतरही तो मला सातत्याने किस करत राहिला. त्या वेळी मी इतकी गोंधळून गेले आणि घाबरले होते की स्वतःसाठी कशी भूमिका घ्यावी, हेच मला सुचले नाही" असे प्रिया म्हणाली.

3 / 6
या चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये सुरू होते आणि दोघेही एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये राहत होते. तिथंही तो अभिनेता प्रियाला सतत त्रास देत होता. तो तिला वारंवार मेसेज करायचा, रात्रीच्या जेवणासाठी (डिनर) आग्रह करायचा, आपल्या रुमवर येण्यास सांगायचा, इतकंच नाही तर 'तुला स्विमिंग शिकवतो' असे बहाणे शोधायचा.

4 / 6
प्रियाने त्याला प्रत्येक वेळी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. इतकंच नाही तर एखाद्या सीनमध्ये केवळ मिठी मारण्याचा साधा प्रसंग असला, तरी त्याचा स्पर्श चुकीचा आणि हेतू वाईट आहे हे तिला स्पष्ट जाणवत होते. तो जाणूनबुजून तिच्यासोबतचे सीन वाढवण्याचा प्रयत्न करत होता, असेही प्रियाने सांगितले.

5 / 6
या अत्यंत त्रासदायक आणि भयानक अनुभवामुळे प्रिया प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. ती दररोज रात्री तिचा पती उमेश कामत याला फोन करून ढसाढसा रडायची. खरं तर, या दोघांनी करिअरच्या सुरुवातीपासून एकमेकांच्या सेटवर कधीही न जाण्याचा नियम केला होता. परंतु, फोनवर प्रियाची झालेली मानसिक अवस्था पाहून उमेशला राहवले नाही. त्याने तो नियम बाजूला ठेवला आणि प्रियाला कोणतीही पूर्वकल्पना न देता तो थेट मुंबईहून भोपाळच्या सेटवर पोहोचला. त्यानंतरचे तीन दिवस तो प्रियासोबतच राहिला, ज्यामुळे तिला या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे बळ मिळाले.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...