AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शार्क टँक इंडियाची जज नमिता थापरचा कान्स मध्ये जलवा, या अभिनेत्रीशी केली तिची तुलना

शार्क टँक इंडियामुळे अनेक उद्योगपतींना लोकं ओळखू लागले आहेत. या शोमधून त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे. शार्क टँक मधील जज नमिता थापर नेहमीच चर्चेत असते. आता ती कान्समधील डेब्युमुळे चर्चेत आहे. तिने कान्ससाठी सुंदर असा ड्रेस डिजाईन करुन घेतला आहे. पहिल्यांदाच ती कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे.

शार्क टँक इंडियाची जज नमिता थापरचा कान्स मध्ये जलवा, या अभिनेत्रीशी केली तिची तुलना
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 16, 2024 | 2:53 PM
Share

शार्क टँक इंडियाची जज नमिता थापरने कान्स 2024 मध्ये कान्समध्ये पदार्पण केलंय. बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचे सर्व तारे नेहमीच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची आतुरतेने वाट पाहत असतात. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’ मध्ये पुन्हा एकदा स्टार्स आपली जादू दाखवत आहेत. कियारा अडवाणी, ऐश्वर्या राय, अदिती राव हैदरी यांच्यासह अनेक भारतीय स्टार्स लवकरच कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसणार आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेत्री दीप्ती साधवानीने देखील रेड कार्पेटवर आपल्या स्टाईलने आणि लुक्सने आधीच सर्वांची मने जिंकली आहेत.

आता ‘शार्क टँक इंडिया’ची जज नमिता थापरने देखील कान्स 2024 च्या दुसऱ्या दिवशी ख्रिस हेम्सवर्थ-स्टार ‘फुरियोसा ए मॅड मॅक्स सागा’ च्या प्रीमियरला हजेरी लावली. नमिताचा लूक सर्वत्र व्हायरल होत आहे. नमिताचा लूक पाहून लोकांनी तिची तुलना अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत केली आहे.

मिंट ग्रीन गाऊनमध्ये नमिता

नमिता थापरने बुधवारी कान्सच्या रेड कार्पेटवर लेबनीज फॅशन डिझायनर एलिओ अबू फैसल यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला. नमिता लेग स्लिट आणि लांब ट्रेन असलेला मिंट ग्रीन गाऊन घालून कान्समध्ये पोहोचली होती. नमिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर कान्सचे काही फोटो शेअर केले आहेत.

नमिताच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. अनेकांनी तिची तुलना प्रियांका चोप्राशी केली आहे. ‘शार्क टँक’ ते ‘कान्स’मध्ये जाणारी नमिता दुसरी जज आहे. याआधी अमन गुप्ता पत्नीसह कान्सला उपस्थित होता.

जेव्हा नमिताला ‘कान्स 2024’ बद्दल विचारण्यात आले, तेव्हा नमिता थापर म्हणाली की, ‘खूपच अप्रतिम वाटतंय, वातावरण बघा, चित्रपट आहेत, संगीत आहे. येथे खूप छान वाटत आहे. मी त्याचा खूप आनंद घेत आहे.

नमिताला तिच्या ड्रेसबद्दल विचारले असता ती म्हणाली, ‘मला हा रंग खूप आवडतो, कारण तो खूप वेगळा आहे. हा असा रंग आहे जो मी यापूर्वी कधीही परिधान केलेला नाही. मला आशा आहे की मी लांब ट्रेन हाताळू शकेन, पण मला मजा येत आहे. मी प्रार्थना करतो की मी रेड कार्पेटवर या गाऊनमध्ये घसरू नये.’

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत