AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शर्मिला टागोर यांचा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, अभिनेत्याने चक्क

बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याचा आदिपुरूष हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

शर्मिला टागोर यांचा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, अभिनेत्याने चक्क
| Updated on: Jul 28, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत राहतो. सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरूष हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनपासूनही सैफ अली खान हा दूर होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या होत्या. मात्र, चित्रपटाला काहीच धमाका हा बाॅक्स आॅफिसवर करता आला नाही आणि हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. आदिपुरूष चित्रपटावरून अनेकांनी सैफ अली खान याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. या चित्रपटामध्ये सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत होता. आदिपुरूष हा प्रभास याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट होता. विशेष म्हणजे हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा देखील होता.

सैफ अली खान याने अमृता सिंहसोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का हा दिसला होता. 90 च्या दशकामध्ये यांची लव्ह स्टोरी ही प्रचंड चर्चेत होती. विशेष म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी अत्यंत गुपचूप पध्दतीने लग्न केले. यांच्या लग्नाला कोणीही उपस्थित नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे यांचे कुटुंबिय देखील उपस्थित नव्हते.

जसेही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी लग्न केले हे कळाल्यानंतर यांच्या कुटुंबियांसोबतच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. इतकेच नाही तर या लग्नाची माहिती ही सैफ अली खान याच्या आईला देखील नव्हती. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाची माहिती कळताच सैफ अली खान याची आई शर्मिला टागोर यांना देखील धक्का बसला होता.

विशेष म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नानंतर शर्मिला टागोर यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केले की, ज्यावेळी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे लग्न झाले त्यावेळी त्या मुंबईमध्येच होत्या. मात्र, यांच्या लग्नाबद्दल त्यांना अजिबातच कल्पना नव्हती.

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालाय. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे दोन मुले असून सारा अली खान हिने बाॅलिवूडमध्ये 2018 ला डेब्यू केला आहे तर आता इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...