AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीनसाठी अभिनेत्रीला कपडे काढायचे होते, मात्र हिंमत होईना; अखेर शशी कपूर म्हणाले, “घाबरू नको…”

एका चित्रपटात अभिनेत्रीला एका सीनसाठी कपडे काढायचे होते. मात्र ती फार घाबरली होती अखेर शशी कपूर यांच्या लक्षात येताच ते अभिनेत्रीकडे गेले अन् तिची समजूत अशाप्रकारे काढली की तिने तो सीन सहजतेनं दिला. 

सीनसाठी अभिनेत्रीला कपडे काढायचे होते, मात्र हिंमत होईना; अखेर शशी कपूर म्हणाले, घाबरू नको...
shashi kapoor and simi garewalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2025 | 7:57 PM
Share

अनेकदा शुटींगदरम्यान विशेषत: इंटीमेट सीन करताना अभिनेत्रींना बऱ्याच अडचणी येतात. बॉलिवूडमध्ये हे किस्से आताच नाही तर 70-80 च्या काळातही घडले आहेत. असाच एक किस्सा घडला होता एक चित्रपटाच्यावेळी. ज्यात अभिनेत्रीला एका सीनसाठी कपडे काढायचे होते. पण ती एवढी घाबरली होती किती तिला हा सीन कसा करावा हे समजत नव्हतं. तेव्हा अभिनेत्याने तिची त्या सीनसाठी मदत केली.

चित्रपटातील एक सीनबाबत अभिनेत्रीला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं

ही अभिनेत्री म्हणजे सिमी गरेवाल आणि अभिनेते होते शशी कपूर. शशी कपूर यांना अतिशय देखणा आणि रोमँटिक इमेज असलेले हिरो म्हटले जायचे. ‘सिद्धार्थ’ चित्रपटात शशी कपूर आणि सिमी गरेवाल स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील एक सीन असा होता ज्याबद्दल तिला खूप अस्वस्थ वाटत होते.

एक सीन असा होता जिथे अभिनेत्रीला कपडे काढावे लागणार होते

चित्रपटात एक सीन असा होता जिथे तिला कपडे काढावे लागणार होते. मात्र ती घाबरली होती. ती थोडी अस्वस्थही होती. तेव्हा शशी कपूर यांनी सिमी गरेवाल समजावलं. त्यांनी तिला धीर दिला आणि सीन शूट करण्यासाठी मदत केली.हा किस्सा सिमीने स्वत:च एका मुलाखतीत सांगितला होता. सिमी गरेवाल म्हणाली, ‘मला त्या दृश्यात खूप अस्वस्थ वाटत होते. मी बॉडी स्टॉकिंग घातले होते आणि मला टॉपलेस व्हायचे होते. मला याची खूप भीती वाटत होती. मला लाज वाटत होती’

शशी कपूर अभिनेत्रीकडे गेले अन् तिला समजावलं

मग शशी कपूर सिमी गरेवालकडे आले. तिला समजालं की आणि म्हणाले ‘सिमी लाजण्याची गरज नाही. तू खूप सुंदर आहेस.’ हे ऐकून सिमीला आत्मविश्वास आला आणि मग तिने तो बोल्ड सीन शूट केला. याचित्रपटात दोघांचा एक इंटिमेट सीन होता जिथे ते किस करताना दिसले होते. आणि त्याकाळी हा सीन प्रचंड व्हायरल झाला होता.

तर अशापद्धतीने शशी कपूर यांनी सिमी गरेवालला बरीच हिंमत दिली आणि चित्रपटातील तो सीन सिमी सहजतेने करू शकली. त्याबाबत ती आजही शशी कपूर यांचं कौतुक  करतेय.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.