
शाहरुख खान आणि गौरी खान हे जोडपं बॉलीवुडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानलं जातं. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. गौरीला आपलंसं करण्यासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली, खूप संघर्ष केला. त्यांच्या लग्नाला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत, तरीही त्यांचं नातं आजही अतिशय मजबूत आहे. काही वर्षांपूर्वी शाहरुख खानचं नाव प्रियंका चोप्रासोबत जोडलं गेलं होतं, तेव्हा खूप खळबळ माजली होती. पण सगळ्या चढ-उतारांनंतरही त्यांचं नातं आजही टिकून आहे. मात्र, गौरी खानने एकदा विश्वासघात आणि असुरक्षिततेबाबत आपलं मत मांडलं होतं. तसंच, जर शाहरुखने तिला फसवलं तर ती काय करेल, याबाबतही तिने स्पष्टपणे सांगितलं होतं.
गौरी खानचं करण जोहरला थक्क करणारं उत्तर
सन 2005 मध्ये गौरी खान करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. त्या शोमध्ये करणने गौरीला तिच्या असुरक्षिततेबाबत प्रश्न विचारला होता. करणने असा प्रश्नही विचारला की, जर शाहरुखने तिला कधी फसवलं किंवा विश्वासघात केला, तर ती काय करेल? तसंच, शाहरुखला मिळणारं स्त्रियांचं प्रेम तिला असुरक्षित वाटतं का?
गौरी खानने याचं उत्तर इतक्या स्पष्टपणे दिलं की करण जोहरही थक्क झाला. गौरी म्हणाली, “मला अशा प्रश्नांचा तिटकारा आहे. पण तू विचारलंस म्हणून सांगते. जेव्हा लोक मला असे प्रश्न विचारतात, तेव्हा मी पूर्णपणे गप्प बसते. मला खरंच खूप चीड येते, पण ठीक आहे…”
“मलाही दुसरं कोणीतरी मिळू दे…”
गौरी पुढे म्हणाली, “मी रोज देवाकडे प्रार्थना करते की जर आम्हाला एकत्र राहायचं नसेल, आणि जर त्याला (शाहरुख खान) दुसऱ्या कोणासोबत राहायचं असेल, तर देवा, मलाही दुसरं कोणीतरी मिळू दे. आणि मी आशा करते की तो देखणा असेल. मी खरंच अशी प्रार्थना करते.”
गौरी इथेच थांबली नाही. ती पुढे म्हणाली, “मला वाटतं, जर त्याला दुसऱ्या कोणासोबत राहायचं असेल, तर मी त्याच्यासोबत राहणार नाही. मी म्हणेन, ठीक आहे, छान! मी दुसऱ्या कोणासोबत तरी पुढे जाईन.”
शाहरुख खानचं प्रोफेशनल फ्रंट
शाहरुख खान आता ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये त्याची मुलगी सुहाना खान मुख्य भूमिकेत आहे. हा सुहानाचा पहिलाच थिएटर चित्रपट आहे.