निधनानंतर स्वप्नात येऊन शेफालीने या व्यक्तीला सांगितली शेवटची इच्छा; ऐकून व्हाल थक्क!
अभिनेत्री शेफाली जरीवालाचं गेल्या महिन्यात निधन झालं. निधनानंतर तिने स्वप्नात येऊन शेवटची इच्छा सांगितल्याचा दावा एका युट्यूबरने केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली.

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शेफालीच्या निधनाने तिचा पती पराग त्यागी पूर्णपणे खचला आहे. पराग त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत शेफालीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतोय. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका युट्यूबरने दावा केला आहे की शेफाली तिच्या स्वप्नात आली होती आणि तिने तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली. संबंधित युट्यूबरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शेफालीने वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. तिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे.
युट्यूबर म्हणाली, “शेफाली माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली. सर्वांत आधी मी हा व्हिडीओ बघणाऱ्यांना सांगू इच्छिते की, याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नका. शेफालीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी, ती माझ्या स्वप्नात आली होती. या सर्व गोष्टींचा काय अर्थ असतो मला माहीत नाही, या गोष्टी कशा पद्धतीने काम करतात, हे मला माहीत नाही. या गोष्टींचा काय संबंध आहे, हेसुद्धा मला कळत नाही. मी अशा गोष्टींवर फार विश्वास ठेवत नाही. परंतु शेफालीने मला जे सांगितलं, ते तुम्हाला सांगावं असं मला वाटतंय. तिला तिच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणायची आहे. त्यांचं धूमधडाक्यात स्वागत व्हावं, अशी तिची इच्छा आहे.”
View this post on Instagram
“शेफालीशी संबंधित हा संदेश तिच्या पतीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने मी हा व्हिडीओ करतेय. तिला गणपती बाप्पाचं आनंदाने स्वागत करायचं आहे, तिला तिच्या घरात त्यांना आणायचं आहे. सर्वकाही चांगल्या आणि योग्य पद्धतीने व्हावं, अशी तिची इच्छा आहे. माझ्या स्वप्नात तिने हेच सर्व सांगितलं आहे. जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर ठीक आहे. परंतु मला कोणत्याही मृत्यूवर आधारित कोणतेच व्ह्यूज घ्यायचे नाहीत”, असं तिने पुढे स्पष्ट केलं.
युट्यूबरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये परागला टॅग केलं आहे. ‘शेफाली गणेशोत्सव काळात खूप खुश असायची. गणपती बाप्पाचं धूमधडाक्यात स्वागत करायची. त्यामुळे परागने ही गोष्ट मनावर घ्यावी’, असं काहींनी लिहिलं आहे.
