Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म…, मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडलेले शेखर सुमन, केला मोठा दावा
Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म..., मुलाच्या निधनानंतर अभिनेते शेखर सुमन यांचा दावा... ज्योतिषींनी केली मोठी भविष्यवाणी... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी केला आहे मोठा खुलासा...

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलेला. शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचं 1995 मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ नावाच्या गंभीर आजाराने निधन झालं. शेखर सुमन म्हणाले, माझे वडील डॉक्टर होते, ते एकदा सहज आयुषला घेऊन बसलेले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आता मुंबईत जाशील तर आयुषला चांगल्या डॉक्टरांना दाखव, त्याचा लिव्हर मला थोडा मोठा वाटत आहे. वडिलांनी सांगितल्यानंतर शेखर यांनी मुलाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं..
अनेक टेस्ट झाल्यानंतर आयुष ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं कळलं. हा असा आजार आहे जो अब्जावधी लोकांपैकी एखाद्यालाच होतो. जेव्हा मी फोनवरून बाबांना या आजाराबद्दल सांगितले, तेव्हा सर्वत्र शांतता पसरली. त्यांच्या तोंडून फक्त एवढेच शब्द बाहेर पडले, “हे देवा!”
तो माझ्या नातवाच्या रुपात परत येईल …
शेखर सुमन म्हणतात, “माझ्या मुलाला गमावल्याचे दुःख मला आजही सतावते. मी याबद्दल अनेकदा बोललो आहे, पण त्यातून मी कधीच पूर्णपणे सावरू शकणार नाही. आम्ही रोज त्याच्याबद्दल बोलतो, त्याचे फोटो पाहतो आणि त्याची आठवण काढतो.” या दरम्यान, शेखर यांनी असा दावा केला की आयुष त्यांच्या नातवाच्या रूपात परत येईल.
पुढे शेखर सुमन म्हणाले, ‘अनेक पुजारी आणि ज्योतिषींनी आम्हाला सांगितलं आहे की, एक दिवस आयुष आम्हाला इशारा देईल. आम्हाला आजही असं वाटतं की, तो आमच्यासोबत आहे. अनेक लोकांनी असं भाकीत केलं आहे की, आयुष एके दिवशी दुसऱ्या रूपात आमच्या कुटुंबात परत येईल. आम्हाला सांगण्यात आलं आहे की, तो अध्ययनचा मुलगा म्हणून परत येईल. आम्ही त्या क्षणाची वाट पाहत आहोत. मला मनापासून वाटतं की तो आमच्या आसपासच आहे. मला त्याचा आवाज ऐकू येतो.’, असं देखील शेखर सुमन म्हणाले.