न सांगण्यालायक, न दाखवण्यालायक; इंटिमेट सीनबद्दल पत्नीला काय म्हणाले शेखर सुमन?
'हिरामंडी' या वेब सीरिजमधील प्रत्येक महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी भन्साळींनी अत्यंत विचारपूर्वक कलाकारांची निवड केली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता फरदीन खानने तब्बल 14 वर्षांनंतर पुनरागमन केलंय. याशिवाय अध्ययन सुमन, शेखर सुमन, मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत.
अभिनेता शेखर सुमनने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या सीरिजमधील त्यांच्या एका सीनची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. यामध्ये मल्लिकाजानची भूमिका साकारणारी अभिनेत्री मनिषा कोईरालासोबतचा शेखर सुमनचा हा इंटिमेट सीन होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर या सीनविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. मनिषा कोईरालासोबत शेखर सुमनचा ओरस सेक्स सीन होता. या सीनविषयी घरी पत्नीला काहीच बोलू शकलो नाही आणि तो पाहण्यासही तिला सांगू शकलो नाही, असं शेखर सुमन म्हणाला.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शेखरने सांगितलं की प्रेक्षक हळूहळू त्या सीनमधील व्यथा समजून घेऊ लागले आहेत, ज्यात नवाबची स्थिती बिकट आहे. इंग्रजांच्या ताब्यात गेल्याने त्याचं सामाजिक स्थान तो गमावू लागला आहे. त्याचप्रमाणे तवायफ यांच्यासोबतच्या सहवासामुळे त्याचं आर्थिक नुकसान होतंय. “लोकांना हळूहळू बग्गीतल्या त्या सीनचा अर्थ समजतोय आणि त्याचा ते स्वीकारही करत आहेत. नवाबची व्यथा त्या सीनमध्ये दडलेली आहे. त्याला परिस्थितीनुसार वागणूक दिली जाते, ती परिस्थिती काही प्रमाणात ब्रिटीशांनी आणि काही प्रमाणात तवायफांनी निर्माण केली आहे. या दोघांमध्ये तो अडकला आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
त्या सीनबद्दल पत्नीला काहीच सांगू शकलो नाही, असंदेखील शेखर सुमनने सांगितलं. “मी माझ्या पत्नीलाही सांगू शकलो नाही. जेव्हा मी शूटिंगवरून परतलो, तेव्हा तिने मला सीनबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी तिला म्हटलं की ते सांगण्यालायक नाही आणि करून दाखवण्यालायकसुद्धा अजिबात नाही. तू तो सीन थेट सीरिज प्रदर्शित झाल्यावरच बघ”, असं तो पुढे म्हणाला.
संजय लीला भन्साळींची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. भन्साळी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने, गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ‘हिरामंडी’ची कथा अत्यंत रंजक आहे. हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या.