Web Series : ‘शेतकरी जगाचा पोशिंदा’ इंदापुरातील तरुणांकडून बेव सीरीजची निर्मिती

Web Series :  ‘शेतकरी जगाचा पोशिंदा’ इंदापुरातील तरुणांकडून बेव सीरीजची निर्मिती

सध्या इंदापूर तालुक्यातील युवक युवतींनी नवा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. (‘Shetkar Jagacha Poshinda’ Web series created by the youth of Indapur)

VN

|

Feb 10, 2021 | 7:18 PM

मुंबई : सध्या इंदापूर तालुक्यातील युवक युवतींनी नवा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. इंदापूर, बारामती, टेंभुर्णे या ग्रामीण भागात रोल, कॅमेरा , अॅक्शन, कट, रिटेक असे कधी न ऐकलेले शब्द इंदापूरकरांच्या कानी पडत आहेत.

सैराट चित्रपटातील चित्रीकरण इंदापूर आणि करमाळा भागातील परिसरात झालेलं आहे. सैराट चित्रपटानं उत्तुंग यशाचं शिखर गाठलंय. त्यामुळे आपणही आपल्याच भागातील कलाकार घेऊन चित्रपट काढायचा किंवा एखादी वेबसीरीज काढण्याची कल्पना या तालुक्यातील युवकांना आली. त्यामुळे वेबसीरीज तयार करण्याचा सपाटा सध्या या युवकांनी लावला आहे.

इंदापूर तालुक्यात श्री अॅग्रो सोलुशन प्रस्तुत प्रथमच शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘शेतकरी जगाचा पोशिंदा’ या वेबसीरीजच्या चित्रीकरणला सुरुवात झाली आहे.

शेतकरी जगाचा पोशिंदा ही वेबसीरीज शेतकऱ्याच्या जीवनावर आधारीत असून त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी त्यातून शेतकऱ्यानं काढ़लेले मार्ग आणि त्यामुळे त्याचं झालेले सुखी जीवन हे या वेबसीरीजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

तसेच या वेबसीरीजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकार आणि ग्रामीण जनजीवन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना घेऊन या वेबसीरीजची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती दिग्दर्शक अतुल भालेराव यांनी दिलीय.

इंदापूर तालुक्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे या ठिकाणी उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र , भिमानदीच्या पात्रात असलेले पळसनाथ मंदीर,  सैराट चित्रपटातील कुगावचा इनामदार वाडा हे ठिकाणं उपलब्ध आहेत.

तसेच इंदापूर आणि बारामती तालुक्यातील लोकांकडूनही या तरुणांना चांगला प्रतिसाद मिळतोय.

संबंधित बातम्या 

Kangana Ranaut : कंगना रनौतचं एक पाऊल मागे, मुंबई मनपाविरोधातील खटला मागे

बजेटमध्ये नाट्यगृहांचा विचार करा, एफडीच्या व्याजातून मेंटेनन्स करा, प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें