करण जोहर, माधुरीवर का भडकली शिल्पा? म्हणाली “नंतर भुंकू नका..”

'झलक दिखला जा 10'च्या परीक्षकांवर चिडली शिल्पा; व्हिडीओ होतोय व्हायरल

करण जोहर, माधुरीवर का भडकली शिल्पा? म्हणाली नंतर भुंकू नका..
Shilpa Shinde Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 6:53 PM

मुंबई- ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोमधून नुकतीच बाद झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती परीक्षक करण जोहर, नोरा फतेही आणि माधुरी दीक्षित यांच्यावर राग व्यक्त करताना दिसतेय. निकाल देताना परीक्षकांनी सर्वांचा समान विचार केला नाही, असा आरोपदेखील तिने केला आहे.

काय म्हणाली शिल्पा शिंदे?

“मी नियाचा शेवटचा परफॉर्मन्स पाहिला. त्यावर तिला जे गुण मिळाले आणि प्रतिक्रिया मिळाल्या ते पाहून मी गप्पा राहिले. करण सर काय धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट देणार का? तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही ऑस्कर देणार आहात का? तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार देणार आहात का? सांगा”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

“त्या तीन मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी कलाकार काय काय करतो हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही रुबिनाचा व्हिडीओ पहा, कोणताही अपघात होऊ शकला असता. त्याचा परिणाम काहीही होऊ शकला असता. त्यानंतर त्याची जबाबदारी परीक्षक घेणार का? नंतर हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर चालण्यात काही अर्थ नसतो. जोपर्यंत तो व्यक्ती समोर आहे, त्याचा आदर करा. नंतर भुंकत बसू नका”, असंही ती पुढे म्हणाली.

झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा पडद्यामागचा संघर्ष शिल्पाने या व्हिडीओतून नेटकऱ्यांना सांगितला. या व्हिडीओच्या अखेरीस तिने परीक्षकांना कलाकारांचा आदर करण्याची विनंती केली आहे. ‘सर्व परीक्षकांना ही माझी नम्र विनंती आहे’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आणखी एका व्हिडीओत तिने शोच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. “करण सरांना डान्स अजिबात येत नाही. जर त्यांना टिप्पणी करायची असेल तर त्यांनी स्वत:वर करावी. माधुरी यांना डान्सबद्दल प्रतिक्रिया देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र जेव्हा त्या भावूक होतात, तेव्हाच सगळी गडबड होते. एका हिंदी शोमध्ये परीक्षण करायचं असेल तर नोराने किमान तेवढी तरी हिंदी भाषा शिकावी”, असेही टोमणे शिल्पाने मारले.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.