प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला बसची धडक, धक्कादायक फोटो समोर
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला सीटीफ्लो बसने धडक दिली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. तर अपघातानंतर कंपनीने जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. संपूर्ण घटनेसाठी ड्रायव्हरला जबाबदार धरल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली.

‘बिग बॉस 18’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. शिवाय साऊथ सुपरस्टार महेश बाबू याची वहिनी असल्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीच्या कारवा सीटीबसने धडक दिली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीच्या कारचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सीटीबसवर टीका केली आहे. अपघातानंतर सीटीबस कंपनीने जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. शिवाय परिस्थिती किती धोकादायक असू शकते हे सुद्धा अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. तक्रार दाखल करण्यात तातडीने मदत केल्याबद्दल शिल्पाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आणि सांगितलं की, कर्मचारी थोडक्यात बचावले असले तरी परिणाम खूपच वाईट होऊ शकला असतं.
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक
शिल्पा शिरोडकरने इंस्टाग्राम स्टोरीजवर सिटीफ्लो बसने धडक दिल्यानंतर नुकसान झालेल्या तिच्या कारचे फोटो शेअर केले. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘आज एक सीटीफ्लो बसने माझ्या कारला धडक दिली. मुंबई ऑफिसचे अधिकारी योगेश कदम आणि विकास मनकोटे… आता मला सांगत आहेत की यामध्ये कंपनीची काहीही चूक नाही. ड्रायव्हरची जबाबदारी आहे. हे लोक किती निर्दयी आहे? एक ड्रायव्हर किती कमावत असेल?

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘@mumbaipolice @cpmumbaipolice यांचे आभार. यांनी कोणत्याही अडचणी शिवाय पोलिसांत तक्रार दाखल करण्यात माझी मदत केली. पण कंपनी घटने कोणतीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. @cityflo.ind या प्रकरणावर माझ्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. सुदैवाने माझे कर्मचारी ठीक आहे आणि त्यांना काहीही दुखापत झाली नाही, पण काहीही घडू शकलं असतं.’ असं शिल्पा म्हणाली. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शिल्पा शिरोडकर हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तेलुगू ‘जटाधारा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्रीने आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित ‘शंकरा – द रिव्होल्यूशनरी मॅन’ नावाचा एक नवीन सिनेमा देखील साइन केला आहे, ज्यामध्ये तिला एका शक्तिशाली आणि प्रभावी भूमिकेत दाखवण्याचं आश्वासन दिलं आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
