Marathi Movie ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, अभिनव बेर्डेनं व्यक्त केल्या भावना

अभिनयच्या 'मन कस्तुरी रे' या आगामी सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालंय. (Shooting of Marathi movie 'Man Kasturi Re' is complete, emotions expressed by Abhinav Berde)

  • Updated On - 6:36 pm, Sat, 13 February 21
Marathi Movie  'मन कस्तुरी रे' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, अभिनव बेर्डेनं व्यक्त केल्या भावना

मुंबई : रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे, अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालंय. त्यानं सोशल मिडीयाद्वारे ही माहिती दिली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन संकेत माने यांनी केलंय.तर सुमीत गिरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहीले आहेत. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या सिनेमाचं चित्रीकरण पूर्णपणे मुंबईत झालं आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

लेखक-दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितला अनुभव

चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक संकेत माने म्हणाले, “कोरोना काळात अतिशय सावधानता बाळगून  ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झालं होतं. अभिनय बेर्डे हा गुणी अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव अप्रतिम होता. या सिनेमाचं चित्रीकरण मुंबईमधील लालबाग, भांडूप, ठाणे, मिरारोड अश्या लाईव्ह लोकेशनवर करण्यात आलंय.

वाचा अभिनयनं काय अनुभव व्यक्त केला

अभिनेता अभिनय बेर्डे चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगतो, “लेखक-दिग्दर्शक संकेत माने यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. स्वतःच्या अभिनयावर अभ्यास करता आला. तसेच सिनेमाची गाणी चित्रीत करताना मी खूप एन्जॉस केलं. मुंबईतल्या लाईव्ह लोकेशनवर चित्रीकरण करतानाचा अनुभव अविश्वसनीय होता.”

इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अॅन्ड आर्टस ,वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे निर्मित, संकेत माने दिग्दर्शित-लिखीत, ‘मन कस्तुरी रे’ सिनेमात अभिनय बेर्डे झळकणार आहे. सध्या इतर कलाकारांची नावे रिवील केलेली नाहीत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या 

ईडीचा कारवाईचा धडाका, आता बॉलिवूड अभिनेता ताब्यात

कंगना रनौतचा आता अरविंद केजरीवालांवर निशाणा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI