AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीचा कारवाईचा धडाका, आता बॉलिवूड अभिनेता ताब्यात

ED detained Bollywood actor राजकारण ते उद्योजकांपासून सिनेसृष्टीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ईडीने कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.

ईडीचा कारवाईचा धडाका, आता बॉलिवूड अभिनेता ताब्यात
| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 6:36 PM
Share

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) महाराष्ट्रात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. राजकारण ते उद्योजकांपासून सिनेसृष्टीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ईडीने कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी आज अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी (Ed detained Business Man & an Indian film actor Sachin Joshi) याला ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध ओमकार बिल्डर (Omkar Builder Mumbai) मनी लाँडरिंग प्रकरणात ही करावाई करण्यात आली आहे.

सचिन जोशी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रकरणात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही सचिनविरोधात अंधेरी (पश्चिम मुंबई) येथील रहिवासी पराग संघवी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संघवीला 58 कोटी रुपये रॉयल्टी न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय 30 माजी कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याचा आरोपही त्यांच्या कंपनीवर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ऑक्टोबर 2020 मध्ये ड्रग्स प्रकरणातही सचिन जोशीवर कारवाई करण्यात आली होती.

कोण आहे सचिन जोशी ?

JMJ group चे मालक जगदीश जोशी यांचे सचिन हे सुपुत्र

सचिन जोशीने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सिनेमांची निर्मिती केली आहे.

सचिन जोशीने श्रीलंकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम खरेदी केली होती.

अजान, मुंबई मिरार, जॅकपॉट, वीरप्पन, अमावस यासारख्या हिंदी सिनेमात काम केलं आहे

ओमकार बिल्डरवर ईडीच्या धाडी

ईडीने नुकतंच जानेवारी महिन्याच्या शेवटी मुंबईतील सुप्रसिद्ध विकासक ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर धाड टाकली होती. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली होती. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर धाड टाकल्या.

अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार बिल्डर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22 हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून 450 कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे.

2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा घोटाळा केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या 

22000 कोटींचा घोटाळा, सुप्रसिद्ध ओमकार ग्रुपच्या अध्यक्ष आणि संचालकांना ईडीकडून अटक    

सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीची धाड, आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन कारवाई 

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.