सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा लग्नानंतर नवा प्रवास; चाहत्यांना दिली गुड न्यूज, लेकाची आईसाठी खास पोस्ट
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेत आहे ते म्हणजे त्याने आईसाठी केलेल्या एका खास पोस्टमुळे. सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा लग्नानंतर एक नवीन प्रवास सुरु झाला आहे. आपल्या आईच्या या प्रवासाला शुभेच्छा देत त्याने एक खास पोस्ट केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर हा नेहमी चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. पण सिद्धार्थची सर्वात जास्त चर्चा झाली होती ती म्हणजे त्याने त्यांच्या आईचं लावून दिलेलं दुसरं लग्न.काही वर्षांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या आईचं वयाच्या 57 व्या वर्षी लग्नगाठ बांधत तिला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड करण्यास मदत केली होती. त्यावेळी नक्कीच या गोष्टीची चर्चा झालीच होती पण त्याहूनही सर्वांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं तर अनेकांनी त्याच्या या धाडसी निर्णयाचं कौतुकही केलं होतं.
सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा लग्नानंतर नवीन प्रवास
आता पुन्हा एकदा सिद्धार्थ चांदेकरची आई संदर्भातील एका पोस्ट चर्चेत आली आहे. सिद्धार्थच्या आईने लग्नानंतर पुन्हा एकदा नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे मात्र ती व्यवसायाच्या रूपाने. सिद्धार्थच्या आईने हा प्रवास सुरु करून वय म्हणजे फक्त एक नंबर हे दाखवून दिलं आहे.
आईच्या प्रवासासाठी लेकाच्या भरभरून शुभेच्छा
सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर आणि मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी आणि नावाजलेली अभिनेत्री आहे. सीमा चांदेकर या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी सुरू केलेला नवा व्यवसाय. त्या आता बिझनेसवुमन झाल्या असून, त्यांनी पुण्यात त्यांचे स्वतःचे दुकान उघडलं आहे. सीमा चांदेकर यांनी पुण्यातील आरण्येश्वर परिसरात पदार्थांचं नवं दुकान सुरू केले आहे. त्यांनी “सीमा फूड्स” या नावाने दुकान सुरू केले असून, सर्व घरगुती गोष्टी त्यांच्या दुकानात मिळतात. आईच्या या नव्या प्रवासासाठी लेक सिद्धार्थने शुभेच्छा देत एक खास पोस्टही शेअर केली आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने आईसाठी केलेली खास पोस्ट
सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट शेअर करत लिहिले, “नवीन बिझनेस! नवीन इनिंग्ज! प्राउड ऑफ यू आई. पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचे नवीन दुकान! सर्व घरगुती गोष्टी. जरूर भेट द्या.” सिद्धार्थने ही पोस्ट शेअर करताच, चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी लाईक करत भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सीमा चांदेकर यांच्या आयुष्यातील हा टप्पा केवळ व्यवसायाची सुरुवात नाही, तर आत्मनिर्भरतेचा, समाधानाचा आणि नव्या आयुष्याची सुरुवात आहे.
