Sidhu Moose Wala Funeral: गोळ्या घालून चाळण केलेल्या सिद्धू मुसेवालावर गावात अंत्यसंस्कार, अफसान खानच्या लग्नातला मुसेवालाचा व्हिडिओ

त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. त्यांच्या कुटुंबियांचं हे दु:ख कधीच भरून निघणार नाही. सिद्धू मुसेवालांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तुम्ही त्यांचा आवडता 5911 ट्रॅक्टर अनेकदा पाहिला असेल. या ट्रॅक्टरमध्ये मुसेवाला यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.

Sidhu Moose Wala Funeral: गोळ्या घालून चाळण केलेल्या सिद्धू मुसेवालावर गावात अंत्यसंस्कार, अफसान खानच्या लग्नातला मुसेवालाचा व्हिडिओ
गोळ्या घालून चाळण केलेल्या सिद्धू मुसेवालावर गावात अंत्यसंस्कारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:46 PM

पंजाब : पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मूसवालांची (Sidhu Moose Wala Murder)हत्या ही सर्वात धक्कादायक बातमी आहे. मे 29 हा काळा दिवस ठरला जेव्हा पंजाबी संगीत विश्वाने एक जबरदस्त सिंगर गमावला. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी सिद्धू यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Sidhu Moose Wala Funeral) करण्यात आले. हा क्षण त्याच्या चाहत्यांसाठी वेदनादायक होता. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांनी पानावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. त्यांच्या कुटुंबियांचं हे दु:ख कधीच भरून निघणार नाही. सिद्धू मुसेवालांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तुम्ही त्यांचा आवडता 5911 ट्रॅक्टर अनेकदा पाहिला असेल. या ट्रॅक्टरमध्ये मुसेवाला यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.

अंत्यसंस्काराचे ठिकाण बदलले

ट्रॅक्टरच्या समोर त्यांचे बॅनर लावण्यात आले होते, मुसेवाला यांना बंदुकांची विशेष आवड होती हे सर्वांनाच माहीत आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या अंत्यसंस्कारावेळी अंतिम दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुरूवातील त्यांचे अंत्यसंस्कार दुसरीकडे होणार होते मात्र ऐनवेळी अंत्यसंस्काराचे ठिकाणही बदलण्यात आले. सिद्धू मुसेवालाचे आई-वडील रडतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. सिद्धूचा शेवटचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

रडतानाचे व्हिडिओ

शेवटचा फोटो

सिद्धू मुसेवालांचा अफसान खानच्या लग्नातला व्हिडिओ

अफसाना खानचा गायक सिद्धू मुसेवालांसोबतचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिद्धू मुसेवाला यावर्षी अफसाना खानच्या लग्नात पोहोचले होते. अफसाना खानच्या लग्नात पोहोचल्यानंतर सिद्धू मुसेवालांनी धमाल केली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर अफसानने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कुणी केली हत्या

सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सिंगरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी घेतली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून तयार करण्यात आला होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई याने तुरुंगात बसून कॅनडामध्ये असलेला त्याचा मित्र गोल्डी ब्रार याच्यासोबत हत्येचा प्लॅन बनवला. लॉरेन्स आणि गोल्डीच्या टोळीने 30 राऊंड फायर केले. सिद्धू मुसेवाला यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा श्वास थांबला होता.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.