AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक थिएटर्समधून ‘सिकंदर’चे शोज रद्द; 3 दिवसांतच सलमानच्या चित्रपटाची डिमांड कमी

अभिनेता सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाची तीन दिवसांतच मागणी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज रद्द झाले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे.

अनेक थिएटर्समधून 'सिकंदर'चे शोज रद्द; 3 दिवसांतच सलमानच्या चित्रपटाची डिमांड कमी
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2025 | 1:30 PM
Share

अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु अनेकांची कथेच्या बाबतीत निराशा झाल्याचं पहायला मिळतंय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त 26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याने थिएटरमध्ये जाऊन तिकिटासाठी पैसे खर्च करण्याबाबत अनेकजण साशंक आहेत. ईदच्या दिवशी ‘सिकंदर’च्या कमाईत बऱ्यापैकी वाढ पहायला मिळाली. मात्र त्यानंतर काही थिएटर्समध्ये ‘सिकंदर’ची डिमांड कमी होत असल्याचं समजतंय. यामुळे अनेक शोज रद्द केले जात आहेत.

सलमान खानच्या ‘सिकंदर’ला प्रदर्शित होऊन अद्याप फक्त तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांतच चित्रपटाची मागणी कमी होताना दिसतेय. ही गोष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी चांगली नाही. ‘एबीपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत अनेक ठिकाणी ‘सिकंदर’चे शोज रद्द करण्यात आले नाहीत. काही ठिकाणी याचे शोज वाढवले गेले आहेत. परंतु सूरज, इंदौर आणि इतर अनेक ठिकाणी ‘सिकंदर’च्या शोजची जागा दुसऱ्या चित्रपटांनी घेतली आहे.

‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना एक चित्रपट व्यापार विश्लेषक म्हणाला, “मुंबईज शोज रद्द झाल्याची माहिती अद्याप आम्हाला मिळाली नाही. काही शोजमध्ये मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते, परंतु त्यामुळे शोज रद्द झाले नव्हते. परंतु सूरत, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर याठिकाणी सिकंदरचे शोज रद्द झाले आहेत.” मिळालेल्या माहितीनुसार, सूरमध्ये सिकंदरच्या दोन नाइट शोजच्या जागी एका गुजराती चित्रपटाचे शोज लावण्यात आले आहेत.

सलमान खानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटींचा गल्ला जमवला होता. सलमान खानचा चित्रपट असून आणि पहिल्याच दिवशी सुट्टी असूनही प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला. याउलट विकी कौशलच्या ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले होते. तर गेल्या दोन दिवसात ‘सिकंदर’ने 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. ‘गजिनी’ फेम ए. आर. मुरुगादोसने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. यामध्ये सलमानसोबतच रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज यांच्याही भूमिका आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.