AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण, तातडीने रुग्णालयात दाखल

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू यालाही कोविड-19 ची लागण झाली आहे. रुग्णालयातून एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे.

गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण, तातडीने रुग्णालयात दाखल
कुमार सानू आणि त्यांचा मुलगा जान सानूImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2026 | 12:03 PM
Share

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानूला कोरोनाचं निदान झालं आहे. रविवारी 12 जुलै रोजी त्याने खुद्द सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. जान सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जान सानूने रुग्णालयातील एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. देशातील इतर भागांमध्येही कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. त्याचवेळी मुंबईत जानलाही कोरोनाची लागण झाली आहे. आंध्र प्रदेशात कोरोनाचे आठ रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

जान सानूने रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘चीन से आया मेरा दोस्त, कोविड को सलाम करो’. रुग्णालयात असतानाही हलकेफुलके विनोद करत तो सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया लिहित त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमक्रॉनसह हजारो कोरोना व्हायरलचे प्रकार समोर आले आहेत. भारतात 30 जानेवारी 2020 रोजी पहिला कोविड-19 चा रुग्ण आढळला होता. तर कोविड-19 ची पहिली केस डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान इथं नोंदवली गेली होती.

जान कुमार सानू हा कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांचा मुलगा आहे. कुमार सानू आणि रीटा यांनी 1986 मध्ये लग्न केलं होतं. मात्र 1994 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कुमार सानू यांनी 2001 मध्ये सलोनी भट्टाचार्यशी लग्न केलं. ‘बिग बॉस’ या शोमध्ये जेव्हा जान स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता, तेव्हा त्याने त्याच्या वडिलांबद्दल अनेक खुलासे केले होते. “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी कधीच काही केलं नाही. मी कुमार सानूचा मुलगा असल्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी मला काम देण्यास नकार दिला. माझी आई सहा महिन्यांची गरोदर असताना वडिलांनी घटस्फोट दिला होता. मला माझ्या आईनेच लहानाचं मोठं केलं,” असं तो म्हणाला होता.

दरम्यान कोरोना संसर्गाची प्रकरणं पुन्हा वाढत असताना कोरोना विषाणूची लक्षणं, प्रतिबंध आणि खबरदारी याबद्दल जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. चव न जाणवलं, वास न येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, सर्दीसारखी लक्षणं, पोट खराब होणं किंवा अतिसार ही सामान्य लक्षणं आहेत.

Follow Us
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल