रणबीर-आलिया-विकीच्या बहुचर्चित चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, कधी रिलीज होणार लव्ह अँड वॉर ?
संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेकर्सनी रिलीज डेही जाहीर केली आहे. कधी रिलीज होणार हा चित्रपट ?

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘लव्ह अँड वॉर’ (Love and War) या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या तिघांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा असून त्याचं शूटिंग आता पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं काम बऱ्याच काळापासून सुरू होतं, ते पूर्ण होणं हे मेकर्ससाठीही खूप महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर आता या चित्रपटाची टीम पोस्ट-प्रोडक्शनच्या कामात गुंतली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनखाली तयार झालेल्या चित्रपटाची प्रेक्षही उत्सुकतेने वाट पहात आहेत. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
इमोशनल फेअरवेलसह पूर्ण झालं शूटिंग
या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण युनिटचं नुकतचं एक इमोशनल फेअरवेल झालं. फिल्मचे कलाकार आणि क्रू यांच्यासाठी हा खास क्षण होता, कारण बऱ्याच काळापासून या चित्रपटाचं काम तसंच शूटिंग सुरू होतं. शूटिंग पूर्ण होताच आता या चित्रटाचं का अंतिम टप्प्यात आलं आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रटात व्हिजुअल्स, बॅकग्राऊंड स्कोअर, एडिटिंग तसेच प्रॉडक्शन डिझाईनचं खास महत्व असतं. त्यामुळे पोस्ट प्रॉड्कशनच कामही तितकचं महत्वाचं मानलं जात आहे.
काय आहे चित्रपटाची कथा ?
चित्रपटाच्या कथेबाबत निर्मात्यांनी सध्या फारशी माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, हा एक रोमँटिक वॉर ड्रामा असल्याचे सांगितलं जात आहे. चित्रपटात प्रेम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाती आणि भावनांची कथा पाहायला मिळू शकते. कथेबाबतची गुप्तता अद्याप कायम असून, चित्रपटाचा फर्स्ट लूकही अधिकृतपणे समोर आलेला नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना फर्स्ट लूक, ट्रेलर आणि प्रमोशनल कॅम्पेनशी संबंधित माहिती समोर येऊ शकते. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच मोठी उत्सुकता असते. त्यामुळे ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रमोशनकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
या तारेखला रिलीज होणार चित्रपट
‘लव्ह अँड वॉर’च्या रिलीजची तारीखही घोषित करण्यात आली आहे. 21 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या वीकेंडचा या चित्रपटाला फायदा मिळू शकतो. हा चित्रपट हिंदी तसेच तामिळ आणि तेलुगू भाषेतही जगभरात रिलीज होणार आहे.
या चित्रपटाची ऋषभ शेट्टीच्या ‘द प्राइड ऑफ भारत: छत्रपति शिवाजी महाराज’ या चित्रपटाशी टक्कर होऊ शकते. त्याचवेळेस हा चित्रपटही रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटाच्या कहाण्या वेगळ्या आहेत, मात्र मोठ स्टार्स आणि तगडं बजेट यामुळे या दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांच आणि इंडस्ट्रीचं लक्ष लागलेलं आहे.
