अनुपमा-जेठालालची सुट्टी! सर्वांना मागे टाकत स्मृती ईराणी बनल्या टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी, रक्कम ऐकून बसेल धक्का

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून स्मृती ईराणी यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चाहते त्यांना पुन्हा टीव्हीवर पाहून खूप आनंदी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या मालिकेसाठी स्मृती इराणी यांनी घेतलेले मानधन हे टीव्ही कलाकरांनी आतापर्यंत घेतलेले सर्वाधिक मानधन आहे. आकडा वाचून धक्काच बसेल.

अनुपमा-जेठालालची सुट्टी! सर्वांना मागे टाकत स्मृती ईराणी बनल्या टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी, रक्कम ऐकून बसेल धक्का
smriti-irani
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 09, 2025 | 11:12 AM

एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी.’ या मालिकेतील पात्रांपासून ते त्यामधील कलाकारांनी संपूर्ण देशातील कलाकारांच्या मनात घर केले आहे. आता कित्येक वर्षांनतर या मालिकेचा पुढचा भाग म्हणजेच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेच्या माध्यमातून स्मृती ईराणी यांच्या पुनरागमनाने छोट्या पडद्यावर खळबळ उडाली आहे. एकीकडे त्यांचा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ हा शो प्रसारित होताच चर्चेत आहे. तर दुसरीकडे स्मृती ईराणी यांचे चाहते त्यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहून आनंद व्यक्त करत आहेत. पहिल्याच आठवड्यात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ ने टीआरपीच्या बाबतीत अनुपमा आणि तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकांना मागे टाकले आहे. यासोबतच स्मृती ईरानी आता टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री बनल्या आहेत.

किती मानधन घेतात?

रिपोर्टनुसार, स्मृती ईराणी यांनी टीव्हीवरील इतर कलाकारांना मानधनाच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्या प्रत्येक भागासाठी 14 लाख रुपये मानधन घेत आहेत. त्यामुळे त्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री बनल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना स्मृती ईराणी यांनी स्वतः त्यांच्या मानधनाची पुष्टी केली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्मृती ईराणी यांनी मान्य केले की त्यांना रेकॉर्डब्रेक मानधन मिळत आहे. तसेच त्यांनी सांगितले की त्यांनी हे मानधन कठोर परिश्रम आणि टीआरपीच्या आकड्यांमुळे कमावले आहे.

वाचा: नवरा माझा नवसाचा सिनेमाला लक्ष्मीकांत बेर्डेने दिला होता नकार; महागुरुंनी सांगितले कारण, विधान चर्चेत

टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

स्मृती ईराणी यांनी अभिमानाने सांगितले की केवळ वेतन समानता नव्हे, तर त्यांनी मुलं आणि मुलींनाही मागे टाकले आहे. त्या म्हणाल्या, “मी एका युनियनचा भाग आहे, त्यामुळे सर्वप्रथम मी माझा युनियन नंबर नोंदवते. आम्ही सर्व एका मोठ्या संस्थेचा आणि कार्यप्रवाहाचा भाग आहोत. एक व्यक्ती उभी राहून म्हणते की, ‘ऐका, केवळ वेतन समानता नाही, मी मुलं आणि मुलींनाही मागे टाकते आणि मी किती कमावते, हे खूप मेहनतीचे काम आहे.”

तुलसी विरानी ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या स्मृती ईराणी यांनी पुढे सांगितले की त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना स्टार बनवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्या म्हणाल्या, “मुद्दा हा आहे की तुम्ही खरोखर स्टार आहात की तुमच्याकडे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना स्टार बनवण्याची व्यावसायिक क्षमता आहे? मला वाटते की माझ्याकडे, सुदैवाने, माझ्यासोबतच्या लोकांना स्टार बनवण्याची क्षमता आहे. जर तुलसीसारखी काही असेल, तर अमर उपाध्याय स्वतःसाठी एक वेगळी बाजारपेठ तयार करतात. तर तुम्ही ती धुरा, तो साउंडिंग बोर्ड बनता का, ज्यामुळे इतर कलाकार त्यांची आर्थिक किंमत वाढवू शकतात? मी या प्रोजेक्टद्वारे हे करण्यात यशस्वी झाले आहे, त्यामुळे आज माझे सहकलाकार म्हणू शकतात, ‘ओह, आम्हीही याचा भाग आहोत.”