AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याच कारणामुळे विराटने राहुल वैद्यला केलं ब्लॉक; अनुष्कासोबतचा Video पाहून नेटकऱ्यांचा अंदाज

विराट कोहलीने गायक राहुल वैद्यला इन्स्टाग्रामवर का ब्लॉक केलं, यामागचं कारण समोर आल्याचं म्हटलं जात आहे. राहुल आणि अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरूनच विराटने त्याला ब्लॉक केलं असावं, असं नेटकरी म्हणत आहेत.

याच कारणामुळे विराटने राहुल वैद्यला केलं ब्लॉक; अनुष्कासोबतचा Video पाहून नेटकऱ्यांचा अंदाज
Rahul Vaidya and Virat Kohli Image Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2025 | 9:12 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. विराटने राहुलला इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॉक केलंय. यावरूनच राहुलने त्याच्यावर निशाणा साधला होता. आता राहुल आणि अनुष्का शर्मा यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे पहायला मिळतंय, त्यामुळेच विराटने राहुलला ब्लॉक केल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. काही दिवसांपूर्वी विराटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजवरील फोटोला लाइक करण्यात आलं होतं. ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर विराटने इन्स्टाग्राम अल्गोरिदमची चूक सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावरून राहुल वैद्यने विराटला खोचक टोला लगावला होता. यानंतर विराटच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं होतं.

आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये राहुल स्टेजवर परफॉर्म करताना दिसत असून त्याच्या बाजूला अनुष्का उभी असल्याचं पहायला मिळत आहे. राहुल तिच्यासाठी गाणं गातो आणि गुडघ्यावर बसून त्याचा हात पुढे करतो. अनुष्कासुद्धा तिचा हात राहुलच्या हातात देते, तेव्हा तो तिच्या हातावर किस करतो. हे पाहून कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक खूप खुश होतात. परंतु याच व्हिडीओवर आता नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘विराटला याच गोष्टीचा राग आला असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘कदाचित याच कारणामुळे त्याने राहुलला ब्लॉक केलं असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

विराटकडून अवनीत कौरचा फोटो लाइक झाल्यानंतर राहुलने त्याची फिरकी घेतली होती. हे विराटच्या चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी राहुल आणि त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर राहुलनेही सोशल मीडियावर राग व्यक्त केला होता. ‘विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत आणि आता तुम्ही मला शिवीगाळ करताय. इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझी पत्नी, माझ्या बहिणीबद्दलही अपशब्द वापरत आहात. त्यांचं याच्याशी काहीच घेणंदेणं नाही. त्यामुळे मी बरोबर बोललो होतो. म्हणूनच विराट कोहलची चाहते जोकर्स आहेत. दोन कवडीचे जोकर्स’, असं त्याने लिहिलं होतं. या वादानंतर आता क्रिकेटर युजवेंद्र चहलनेही राहुलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...