
Son of Sardaar 2 Actress: अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळेअधिक चर्चेत असतात. प्रेम, ब्रेकअप, रिलेशनशिपबद्दल आता अभिनेत्री मोकळेपणाने बोलतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘सन ऑफ सरदार 2’ फेम अभिनेत्री रोशनी वालिया (Roshni Walia) आहे.
रोशनी सध्या ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. रोशमी हिच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी दुसरा संसार थाटला. पण आईने मात्र सिंगल मदर म्हणून आयुष्य व्यतीत केलं. आता रोशनी आई आणि बहिणीसोबत मुंबईत राहते…
आईबद्दल रोशनी म्हणाली, ‘माझी आई स्टाँग महिला आहे. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या आईने स्वतःच्या स्वप्नांचा बळी दिला.’ त्याच वेळी, जेव्हा रोशनीला तीन गोष्टी सांगण्यास सांगितलं गेलं, ज्यावर लोकांना विश्वास बसणार नाही की, अभिनेत्रीने आईसोबत शेअर केल्या आहेत.
प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘माझी आई कायम मला प्रोटेक्शन यूज करायला सांगते. एका भारतीयाच्या घरात हे खूप वेगळं आहे. माई आई म्हणते, आयुष्यात काहीही कर पण प्रोटेक्शन वापर… माझ्या बहिणीला देखील आई हेच सांगते. माझी आई कायम सांगते बाहेर जा, घरात बसू नका… ‘ अभिनेत्रीची आई दोन्ही मुलींना आयुष्य आनंदाने जगायला सांगते.
शाळेतील आयुष्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री, ‘शाळेत फक्त मुलं माझे मित्र होते. मुली माझ्या मैत्रिणी नव्हत्या… माझी पूर्ण गँग होती. मी शाळेत पाठच्या बाकावर बसायची. पण इथे समस्या शिक्षिकेची होती. इथे शिक्षिकेने स्त्रीवाद आणि समानतेबद्दल शिकवलं पाहिजे. त्यांनी मला मागे बसू दिले नाही. त्यांच्यासाठी, माझे सर्व मुलांशी प्रेमसंबंध होते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.