सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा, भावामुळे नाही केलं थाटात लग्न, म्हणाली, ‘आई – वडिलांना सांगितलं होतं की…’

Sonakshi Sinha: मुस्लीम मुलासोबत लग्न, सोनाक्षी सिन्हाच्या कुटुंबियांमध्ये नाराजी... अभिनेत्रीने भावामुळे नाही केलं थाटात लग्न, अखेर म्हणाली, 'आई - वडिलांना सांगितलं होतं की...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या वक्तव्याची चर्चा...

सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा, भावामुळे नाही केलं थाटात लग्न, म्हणाली, 'आई - वडिलांना सांगितलं होतं की...'
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 11:16 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकताच, सोनाक्षी आणि झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं आणि सेलिब्रिटींसाठी पार्टी देखील ठेवली होती. दोघांच्या लग्नाचे आणि पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशात सोनाक्षी हिने थाटात लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. भाऊ कुश सिन्हा याच्यामुळे थाटात लग्न केलं नाही… असं वक्तव्य सोनाक्षी हिने केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘मोठ्या थाटात लग्न करण्याचा दबाव आमच्यावर देखील होता. पण आम्हाला कसं लग्न करायचं आहे… या सर्व गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या. माझा भाऊ कुश याचं लग्न फार थाटात झालं होतं. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात 5 ते 8 हजार लोकं उपस्थित होते. मी तेव्हाच माझ्या आई – वडिलांना सांगितलं होतं की माझं लग्न असं होणार नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली.

सोनाक्षीच्या भावाच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2015 मध्ये कुस याने तरुणा अग्रवाल हिच्यासोबत लग्न केलं. दोघांचं लग्न मोठ्या थाटात झालं. लग्नात अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

स्वतःच्या लग्नाबद्दल कायम म्हणाली सोनाक्षी?

सोनाक्षी म्हणाली, ‘आपल्या आयुष्यात हे क्षण फक्त एकदाच येतात. त्यामुळे मला माझ्या आयुष्यातील या क्षणांना आणखी खास करायचं होतं. त्यामुळे आम्हाला हवं होतं तसं लग्न आम्ही केलं. काही मित्र होते जे नाराज होते. त्यांना लग्नातील सर्व कार्यक्रम हवे होते. माझा मित्र मोहित स्टायलिस्ट आहे. त्याला वाटत होतं मी लग्नात पाच वेळा कपडे बदलावे. पण मी फक्त एकदाच लूक बदलला. ज्यामुळे तो नाराज झाला होता.’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. रिसेप्शन सोहळ्यात अभिनेत्रीचा भाऊ कुश सहभाही होता. पण भाऊ लव मात्र बहिणीच्या लग्नात नव्हता. दरम्यान, सोनाक्षी मुस्लीम मुलासोबत लग्न करत आहे, त्यामुळे सिंहा कुटुंबात नाराजीचं वातावरण आहे… अशी देखील चर्चा रंगली होती.

Non Stop LIVE Update
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.