सोनाक्षी सिन्हा हिच्या होणाऱ्या पतीचे ‘ते’ फोटो व्हायरल, झहीर इक्बाल दुबईमध्ये…
Sonakshi Sinha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आलीये. 23 तारखेला सोनाक्षीचे लग्न आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता झहीर इक्बाल याला गेल्या सात वर्षांपासून डेट करत आहे. आता 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा लग्न करणार आहेत. मात्र, अशी एक चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे की, झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे सिन्हा कुटुंबिय नाराज आहेत. विशेष: सोनाक्षी सिन्हाची आई आणि भाऊ नाराज आहेत.
झहीर इक्बाल याच्या कुटुंबासोबत धमाल करताना काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा दिसली. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज सोनाक्षी सिन्हा हिला हळद लागणार आहे. तिच्या आई वडिलांच्या घरी नव्हे तर तिच्या बांद्रातील घरीच हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे कळतंय. हळदीला काही जवळचे मित्र आणि कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.
आता लग्नाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती आणि अभिनेता झहीर इक्बाल हा दुबईमध्ये धमाल करताना दिसतोय. झहीर इक्बालचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये झहीर इक्बाल आपल्या मित्रांसोबत धमाल करतोय. झहीर इक्बाल याने आपल्या बॅचलरेट पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

झहीर इक्बाल याने आपली बॅचलरेट पार्टी चक्क दुबईमध्ये केलीये. आता हेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा ही देखील बॅचलरेट पार्टीमध्ये धमाल करताना दिसली. फोटोमध्ये झहीर इक्बालचे मित्र धमाल करताना दिसत आहेत. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे कळतंय.
हेच नाही तर लग्नानंतर एका मोठ्या पार्टीचे देखील आयोजन केले जाईल. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसते. सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिकाही केलीये. सोनाक्षी सिन्हाकडे मोठी संपत्ती देखील आहे.
