Sonakshi Zaheer Wedding : ‘तेरे मस्त मस्त दो नैन…गाण्यावर थिरकले सोनाक्षी-जहीर, केक कापून धमाल सेलीब्रेशन

Sonakshi- Zaheer Wedding Reception: सोनाक्षी आणि झहीरचं काल रजिस्टर मॅरेज झालं. त्यानंतर या जोडप्याने काल त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यादरम्यान दोघांनीही मोठ्ठा केक कापून सेलिब्रेशन केलं. या पार्टीत दोघांनीही अनेक गाण्यांवर डान्स करत धमालही केली.

Sonakshi Zaheer Wedding : तेरे मस्त मस्त दो नैन...गाण्यावर थिरकले सोनाक्षी-जहीर, केक कापून धमाल सेलीब्रेशन
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाचे रिसेप्शन धूमधडाक्यात पार पडलं.
Image Credit source: social media
| Updated on: Jun 24, 2024 | 11:50 AM

तब्बल सात वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल काल ( 23 जून) विवाहबद्ध झाले. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत काल दोघांनी खासगी सोहळ्यात रजिस्टर मॅरेज केले असून आता ते बॉलिवूडमधील नवविवाहीत जोडपं बनले आहेत. त्यानंतर सोनाक्षी जहीरने चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकलाकारांसाठी, मित्रांसाठी मुंबईत एक मोठ्ठ रिसेप्शन दिलं. यावेळी सलमान खान, काजोल, रेखा, अदिती राव हैदरी, अनिल कपूर, तब्बू , रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांनी नवविवाहीत जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या रिरेप्शनमध्ये धमाल करताना सोनाक्षी-जहीरने मोठ्ठा केक कापून सेलिब्रेशन केलं.

लग्न -रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या स्वप्नवत वाटणाऱ्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रजिस्टर मॅरेजनंतर या जोडप्याने मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केलं होतं ज्यामध्ये बॉलिवूड उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सध्या या जोडप्याच्या या फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहेत. पण या सगळ्यामध्ये एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे ज्यामध्ये हे नवविवाहित जोडपं एका गाण्यावर नाचताना आणि सुंदर केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

तेरे मस्त- मस्त दो नैन गाण्यावर थिरकले सोनाक्षी -जहीर

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शन पार्टीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघांनी सुंदर केक कापला. रिसेप्शनसाठी सोनाक्षी ही लाल रंगाच्या सुंदर साडीत आली. मात्र त्यानंतर पार्टीमध्ये तिने लाल रंगाचाच दुसरा सुंदर अनारकली ड्रेस घातला. त्यामध्ये ती अतिशय अप्रतिम दिसत होती. तर झहीर इक्बाल हा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात देखणा दिसत होता. केक कापताना दोघांनी सोनाक्षीच्या ‘दबंग’ चित्रपटातील मस्त मस्त नैन गाण्यावर मस्त डान्स केला. तर केक कापतानाही त्यांचा मागे आफरीन आफरीन हे गाण वाजत होतं

या रिसेप्शनमध्ये सोनाक्षी-जहीरने एकमेकांवर प्रेमाच खूप वर्षाव केला. या पार्टीत नवविवाहीत जोडप्याने एकमेकांचा हात हात घेऊन सुंदर डान्सही केला. त्यांच्या पार्टीचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

सात वर्ष डेट केल्यावर सोनाक्षी-जहीरने केलं लग्न

सोनाक्षी-झहीरची पहिली भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांनी एकमेकांना तब्बल सात वर्षे डेट केले आणि अखेर काल, 23 जून रोजी दोघांनी घरच्यांच्या उपस्थितीत लग्न केले.

 

 

Follow Us