AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Kulkarni : तो स्वतःला मोठा स्टार…सोनाली कुलकर्णीनं सांगितला सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचा अनुभव

Sonali Kulkarni On Superstar Nani : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'द पॅराडाईज' या सिनेमात नानीसोबत काम करत आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीनं सुपरस्टारसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केलाय.

Sonali Kulkarni : तो स्वतःला मोठा स्टार...सोनाली कुलकर्णीनं सांगितला सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचा अनुभव
| Updated on: Oct 05, 2026 | 6:34 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता अभिनेत्री ‘द पॅराडाईज‘ या दाक्षिणात्य सिनेमामध्येही झळकत आहे. या सिनेमात सोनालीनं ‘सम्माक्का’ची भूमिका साकारली आहे. या सिनेमात सोनालीनं सुपरस्टार अभिनेता नानीसोबत काम केलंय. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत सोनालीनं नानीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

‘मुंबई टाइम्स‘ला दिलेल्या मुलाखतीत ‘द पॅराडाईज‘ या सिनेमातील भूमिकेबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, ‘सम्माक्का या भूमिकेसाठी कोणाला तरी माझं नाव सुचलं आणि मला तिथून फोन आला की, ‘तू ऑडिशनला किंवा मेकर्सना भेटायला येशील का?’ माझा ऑडिशन प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे. कारण ऑडिशन म्हणजे केवळ तुमची अभिनय क्षमता तपासणं नव्हे, तर मेकर्सना तुम्ही त्या पात्राच्या लूकमध्ये किंवा झोनमध्ये बसता का, हेही तपासायचं असतं. त्यासाठी मी हैदराबादला गेले. मला तेलूगू भाषा येत नव्हती. पण तिथल्या ऑडिशन आणि भेटीनंतर मेकर्सनी लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली.’

‘एका मोठ्या व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत त्यांना एका शोषित घटकाच्या अस्तित्वाचा संघर्ष मांडायचा होता. चित्रपटात ‘सवारी’ नावाच्या जातीला स्वतःची ओळख नाही आणि मी त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘सम्माक्का’ या कणखर महिला लीडरची भूमिका साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यातही मला माझ्या किंवा कोणाच्याही अस्तित्वासाठी आणि समानतेसाठी लढायला नक्कीच आवडेल. माझं खरं आयुष्य आणि विचार ज्या मूल्यांवर आधारित आहेत, तशाच पद्धतीची ही भूमिका असल्यामुळे दिग्दर्शक-निर्मात्यांवर पूर्ण विश्वास ठेवून मी हे काम आनंदानं स्वीकारलं.’

नानीबद्दल काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?

नानीसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना सोनाली म्हणाली की, ‘तेलूगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरीत्या बोलता यावेत, यासाठी नानीनं मला मदत केली. काम करताना आमच्या मनात एकमेकांविषयी विश्वास निर्माण झाला. आम्ही केवळ प्रसंगांपुरते मर्यादित राहिलो नाही, तर काम, कुटुंब, विचार, मतं याबद्दलही खूप गप्पा मारल्या.’

‘नानी सेटवर स्वतःला मोठा ‘स्टार’ किंवा ‘हीरो’ न समजता अगदी एका जवळच्या मित्रासारखा वागायचा. शूटिंग करताना तो मला आणि मी त्याला मोकळेपणानं कोणत्याही गोष्टी सुचवू शकत होतो. अॅक्शन सीन्समध्ये शरीराचा तोल कसा सांभाळायचा किंवा तलवार कशी धरायची, अशा तांत्रिक गोष्टींमध्ये त्यानं मला खूप मदत केली. तो सेटवर प्रत्येकाची आणि सर्व गोष्टींची काळजी घ्यायचा. त्याच्या या वृत्तीमुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं आहे.’ असं सोनाली शेवटी म्हणाली.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी