कॉन्सर्टमध्येच बिघडली सोनू निगमची प्रकृती, व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते चिंतेत

Sonu Nigam Health Update: भर कॉन्सर्टमध्येच बिघडली सोनू निगमची प्रकृती, आता कशी गायकाची प्रकृती? सोशल मीडियावर व्हिडीओपोस्ट करत स्वतः दिली हेल्थ अपडेट..., गायकाच्या चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता...

कॉन्सर्टमध्येच बिघडली सोनू निगमची प्रकृती, व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते चिंतेत
| Updated on: Feb 03, 2025 | 11:27 AM

Sonu Nigam Health Update: देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम याची प्रकृती भर कॉन्सर्टमध्येच बिघडल्याची माहिती समोर आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. लाइव्ह परफॉर्म करत असताना पाठीत तीव्र वेदना होत असताना देखील आपल्या वेदनांवर मात करत प्रत्येक वेळी प्रमाणेच गायकाने चमकदार कामगिरी केली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. पुणे येथे कॉन्सर्ट सुरु असताना सोनू निगम याची प्रकृती बिघडली.

सोनूला कॉन्सर्टपूर्वीच तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर त्याला कॉन्सर्ट करणं कठीण झालं. तरी देखील गायकाने परफॉर्म केलं. कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडीओ देखील सोनूने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली.

 

 

व्हिडीओ पोस्ट करत सोनू म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस. पण समाधानकारक… मी गात होतो आनंद लूटत होतो. अशात मध्येच तीव्र वेदना सुरु झाल्या. मी कसंबसं स्वतःला सावरलं . लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात तेव्हा तुम्हाला त्यांना निराश करायला आवडत नाही..’

पुढे गायक म्हणाला ‘मला प्रचंड वेदना होत्या… असं वाटत होती की कोणी माझ्या मणक्यात सुई टोचणार आहे. थोडा जरी हललो असतो तर, सूई माझ्या मणक्यात घुसली असती.’, ‘काल रात्री सरस्वतीने माझा हात पकडला…’ असं देखील सोनू निगम पोस्टमध्ये म्हणाला आहे. सोनूचा कॉन्सर्टनंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

परफॉर्मन्सपूर्वी देखील सोनूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये गायक वेदना कमी कणरण्यासाठी तो परफॉर्मन्सपूर्वी स्ट्रेचिंग करताना दिसला. आता चाहत्यांनी देखील सोनूच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू याची चर्चा रंगली आहे. सोनू याने पोस्ट केलेल्या व्हिडीओ कमेंट करत अनेकांनी गायकाला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं आहे.