
Sonu Nigam Video: गायक सोनू निगम याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गाणं गात असताना एक चाहता सोनू निगम याला वाईट प्रकारे धमकी देतो. ज्यामुळे संतापात सोनू निगम म्हणतो, ‘पहलगाममध्ये जे झालं आहे, त्यासाठी हेच कारण आहे… सध्या सर्वत्र गायकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे.
गायक सोनू निगम याने नुकताच बेंगळुरूमधील ईस्ट पॉइंट कॉलेजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान एका मुलाला फटकारलं आहे. कार्यक्रम सुरु असताना मुलाने गायला कन्नडमधील गाणं गा… असं धमकावत सांगितलं. यावर सोनू निगम याने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोनू निगम म्हणाला, ‘संपूर्ण जगात कोणत्याही देशात गेल्यानंतर मी कायम म्हणतो कर्नाटकातील चाहत्यांवर माझं प्रेम आहे. 14 हजार लोकांमधून मला एका आवज कन्नड चाहत्याचा येतो आणि त्या एका चाहत्यासाठी मी कन्नड गाणं म्हणतो. मी तुमचा इतका आदर करतो. त्यामुळे तुम्ही देखील असं नाही करायला हवं… हेच कारण आहे पहलगाममध्ये जे काही झालं त्यासाठी… सध्या सोनू निगम याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गायकाबद्दल सांगायचं झालं तर, सोनू निगम याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 1992 मध्ये प्रसारित झालेल्या ‘तलाश’ मालिकेतून सोनूने करीयरची सुरुवात केली. मालिकेतील ‘हम तो छैला बन गए’ गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. त्यानंतर सोनू निगम याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, परदेस सिनेमातील ये दिल दिवाना यांसारखे अनेक हीट गाणी सोनू निगमने बॉलिवूडला दिले आहेत. हिंदी आणि कन्नड व्यतिरिक्त त्याने बंगाली, मराठी, तेलगू, तमिळ, उडिया, इंग्रजी, आसामी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाळी, तुलू, मैथिली आणि मणिपुरी भाषेतही गाणी गायली आहेत.