‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

'तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल', सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून कामगार आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता सोनू सूद आताही आपल्या मदतीचं काम करतो आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 22, 2021 | 7:41 PM

मुंबई : देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून कामगार आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता सोनू सूद आताही आपल्या मदतीचं काम करतो आहे. स्वतः कोरोनाने बाधित झालेला असतानाही त्याने देशभरातील शेकडो लोकांची मदत केल्याने अनेक लोक त्याच्या कामाला सलाम करत आहेत. सोनू सूदच्या मदतीच्या सातत्याने अनेकजण अवाक झालेत. आताही असाच अनुभव आलाय. नागपूरमधील एका तरुणीने वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत व्हेंटिलेटर मिळत नसल्याची अडचण सांगितली आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली. यावर सोनू सूद यांनी तात्काळ तिला आधार देत मदतीचं आश्वासन दिलं (Sonu Sood continuously helping poor and needy people amid Corona crisis).

नागपूरच्या रोशनी बुराडे या तरुणीने ट्विट केलं, “माझे पप्पा कोरोना बाधित आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची खूप गरज आहे. संपूर्ण नागपूरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीये. सोनू सूद सर मला कृपया मदत करा. माझ्या पप्पांना वाचवा प्लिज. तुम्हीच मला मदत करु शकता.” यावर सोनू सूदने तात्काळ प्रतिसाद देत तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही. एका तासात त्यांना व्हेंटिलेटर मिळेल असं ट्विट केलं.”

मागील वर्षभरापेक्षा अधिक काळात सोनू सूदने हजारो लोकांना मदत केलीय. दररोज शेकडो लोक सोनू सूद यांच्याकडे मदतीची मागणी करतात. त्यावर सोनू सूद आपल्या क्षमतेप्रमाणे या सर्वांना मदत करतात असतात.

सोनू सूदच्या मदतीचे आकडे

21एप्रिल 2021

ऑक्सिजनती मागणी – 127
उपलब्ध करण्यात यश – 93

रेमडेसिवीरची (Remdesivir) मागणी – 527
उपलब्ध करण्यात यश – 83

आयसीयू बेडची मागणी – 422
उपलब्ध करण्यात यश – 196

19 एप्रिल 2021

बेडसाठीची मागणी – 570
उपलब्ध करु शकण्यात यश – 112

रेमडेसिवीरची मागणी – 1477
उपलब्ध करुन देण्यात यश – 18

इतकी मदत करुनही सोनू सूद यांनी हो आम्ही अपयशी ठरलोय हे कबूल केलं. तसेच ही अशीच आपली आरोग्य यंत्रणा आहे, असंही नमूद केलं.

हेही वाचा :

सोनू सूदने सांगितला कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा फंडा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला!

Sonu Sood Corona | Sonu Sood Corona | कोरोना काळात लाखो गरजवंतांना मदत, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

Sonu Sood | विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!

व्हिडीओ पाहा :

Sonu Sood continuously helping poor and needy people amid Corona crisis

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें