गावकरी म्हणाले, आमच्या गावात माकडांचा उच्छाद वाढलाय, सोनू म्हणाला, आता तेवढंच करायचं राहिलं!

कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती.

गावकरी म्हणाले, आमच्या गावात माकडांचा उच्छाद वाढलाय, सोनू म्हणाला, आता तेवढंच करायचं राहिलं!
तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता. (Sonu Sood responds to a young man’s tweet asking for help)

सोनू सूदला बासू गुप्ता नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, ‘सोनू सूद सर, आमच्या गावात लंगूर माकडाने डझनभर लोकांना जखमी केले आहे आणि गावामध्ये त्या माकडाची दहशत निर्माण झाली आहे तरी तुम्ही काहीही करून आमच्या गावापासून दूर जंगलात त्या माकडाला पाठवा, माझी विनंती आहे. या ट्विटरवर उत्तर देताना सोनू सूदने लिहिले की, आता हे माकड पकडायचे काम राहिले होते, आता ते पण करून पाहतो मित्रा… पत्ता पाठवा…सोनू सूदच्या या भन्नाट उत्तरानंतर एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे खरोखरच आता सोनू सूद माकड पकडण्यासाठी जाणार का?

अलीकडेच सोनू सूदला संयुक्त राष्ट्राकडून एसडीजीचा विशेष मानवतावादी कृती पुरस्कार मिळाला. म्हणून गावातील लोकांनी त्याचे मंदिर बांधण्याचे ठरविले. कोरोना काळात स्थलांतरितांसाठी आधार म्हणून आलेल्या बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या उदारपणाची प्रत्येकजण स्तुती करीत आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनीही त्याला देवाचा दर्जा दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | लेकीनं ट्विंकल खन्नासाठी गिटार वाजवून गायलं गाणं, पाहा व्हिडीओ !

Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ

Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा

(Sonu Sood responds to a young man’s tweet asking for help)

Published On - 1:22 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI