Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा

केरळ पोलिसांनी तिरुअनंतपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये सनी लिओनीची चौकशी केली होती. (Sunny Leone Kerala Cheating Charges)

Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा
अभिनेत्री सनी लिओनी
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 9:06 AM

तिरुअनंतपुरम : लाखो रुपयांचा अ‍ॅडव्हान्स घेऊनही केरळातील कार्यक्रमाला दांडी मारल्याने अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चर्चेत आली होती. मात्र आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत सनीने आयोजकांचे दावे फेटाळले. संबंधित करारामध्ये वेळेत पेमेंट मिळाले नसल्याचा दावा सनीने केला आहे. केरळ पोलिसांनी तिरुअनंतपुरममधील एका खासगी रिसॉर्टमध्ये सनीची चौकशी केली होती. त्यानंतर कोचीतील इव्हेंट मॅनेजरने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. (Sunny Leone reacts on Kerala Cheating Charges calls them Deeply Hurtful)

केरळमध्ये विविध उद्घाटन समारंभांना हजेरी लावण्याचं आश्वासन देत अभिनेत्री सनी लिओनीने 29 लाख रुपये घेतले, मात्र कार्यक्रमांना हजेरी लावली नाही, अशी तक्रार इव्हेंट मॅनेजर आर शियास यांनी दाखल केली होती. 2019 मधील कार्यक्रमासाठी हे मानधन घेतलं गेल्याची माहिती आहे. मात्र इव्हेंट मॅनेजरने चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप सनीने केला आहे.

“मी सामंजस्य दाखवलं, पण…”

“अर्धी माहिती ही चुकीच्या माहिती इतकीच भीषण असते. कलाकार म्हणून काम हेच मी माझं दैवत मानते. आयोजकांसाठी मी अनेक वेळा माझं शेड्यूल बदलण्याचा समंजसपणाही दाखवला. पण त्यांनी तारीख नक्की केलीच नाही. अभिनेत्यांची वेळ घेण्यासाठी आगाऊ रक्कम देणे ही जनरित आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तेही दिले गेले नव्हते” असं सनीने सांगितल्याचं वृत्त ‘Latestly’च्या वेबसाईटवर आहे.

“चिखलफेक करणारे आरोप धक्कादायक”

“वेळ दिल्यानंतर मी एखाद्या इव्हेंटला जाणार नाही, असं शक्यच नाही. वेळेत पेमेंट न केल्यामुळे मी माघार घेतली. पूवरमध्ये मी इतर कार्यक्रम ठरवले होते. आम्ही घड्याळाच्या काट्यावर शूटिंग करत होतो. कोरोना काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घातला होता. मनोरंजन विश्व रुळावर यावं, इतकीच आमची इच्छा होती. मात्र इव्हेंट समन्वयकांचे असे चिखलफेक करणारे आरोप आणि वर्तन धक्कादायक आहे” अशी प्रतिक्रिया सनीने दिली.

करारानुसार कार्यक्रमाच्या सात दिवस आधी साडेबारा लाखांची रक्कम देणे बंधनकारक होते, मात्र ते अद्याप मिळालेले नाहीत. तरीही आपल्या वेळापत्रकात बसल्यास कार्यक्रमाला हजेरी लावण्याची तयारी सनीने दर्शवली होती, अशीही माहिती आहे.

“मी तपास अधिकाऱ्यांना माझा जबाब दिला आहे आणि ते तक्रारदार समन्वयकांचीही चौकशी करत आहेत” असं सनीने सांगितलं. सध्या ती तिरुअनंतपुरममध्ये एमटीव्ही स्प्लिट्सविला (MTV Splitsvilla) या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहे.

संबंधित बातम्या :

लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी

(Sunny Leone reacts on Kerala Cheating Charges calls them Deeply Hurtful)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.