लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी

लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी, केरळ पोलिसांकडून चौकशी (Sunny Leone interrogated by Kerala Police)

लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी
लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी

केरळ : अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण आहे सनी लिओनीची केरळ पोलिसांकडून सुरु असलेली चौकशी. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी अॅडव्हान्स लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊनही सनी उपस्थित न राहिल्याने शुक्रवारी पोलिसांनी चौकशी केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी सनी लिओनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Sunny Leone interrogated by Kerala Police)

काय आहे प्रकरण?

तक्रारदार असलेल्या आयोजकांनी केरळमधील कोच्चीमध्ये दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सनी लिओनीने 29 लाख रुपयांचे आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी 29 लाख रुपयांचा करार केला होता. करारानुसार कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सनीने 29 लाख रुपये आयोजकांकडून अॅडव्हान्स घेतले होते.

आरोपावर काय म्हणाली सनी लिओनी?

कोरोना महामारी असल्यामुळे आपण कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो नाही. तसेच आयोजकांकडून कार्यक्रमात 5 वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे याला आयोजकच जबाबदार असल्याचे सनीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलेय. सनी लिओनीच्या वतीने एका व्यक्तीने सांगितले की, कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी 29 लाख नाही तर 12 रुपये घेण्यात आले होते. हे पैसे आम्ही लवकरच परत करणार आहोत.(Sunny Leone interrogated by Kerala Police)

इतर बातम्या

दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, ‘हिरो सरपंच’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ!

Published On - 7:10 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI