Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14)चा एक प्रोमोसमोर आला आहे. यामध्ये या आठवड्यात बिग बॉसमध्ये धमाल करण्यासाठी दिशा पटानी (Disha Patani) येणार आहे.

Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला 'स्लो मोशन में' गाण्यावर डान्स!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)चा एक प्रोमोसमोर आला आहे. यामध्ये या आठवड्यात बिग बॉसमध्ये धमाल करण्यासाठी दिशा पटानी (Disha Patani) येणार आहे. दिशासोबत रणदीप हूडासोबत शोमध्ये येणार आहे. ज्यामध्ये दिशा स्टेजवर सलमान खान (Salman Khan) समवेत स्लो मोशन गाण्यावर डान्स करणार आहे. घरातील सदस्य देखील या गाण्यावर डान्स करणार आहेत. यावेळी अर्शी खानच्या उर्दूता मज्जाक उडवण्यात येणार आहे. यावेळी रणदीप अर्शीला उर्दू बोलायला सांगतो आणि अर्शी उर्दू बोलण्यास सुरूवात करते अर्शीची उर्दू ऐकून सर्वच जन पोट धरून हासण्यास सुरूवात करतात. (Bigg Boss 14 | Salman Khan dances with Disha Patani)

‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खान घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेताना दिसत आहे. विशेष करून सलमान राखीला बरेच सुनवतो इतकेच नाहीतर सलमान राखीला शो सोडून जायला सांगतो आणि घराचे दरवाजे देखील उघडतात मात्र, राखी बिग बॉसचे घर सोडून जात नाही. सलमान घरातील सदस्यांना म्हणतो की, तुम्ही प्रत्येक टास्क रद्द करतात तुम्ही टास्क सुरू होताच विजेता ठरून टाकतात मग टास्क घ्यायचे कशासाठी वीकेंड का वारमध्ये सलमान एक-एक करून घरातील सर्व सदस्यांचा क्लास घेणार आहे.

बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि देवोलीना भट्टाचार्य यांच्या जोरदार वाद होताना दिसले आहे. मात्र, या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्य बिग बॉस घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली आहे, देवोलीनाने अर्शीच्या हातातील अन्न फेकून देते अर्शीला शिवीगाळही करताना दिसत होती.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?

(Bigg Boss 14 | Salman Khan dances with Disha Patani)

Published On - 6:14 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI