रोहित शेट्टीने असं कोणतं वचन दिलं, जे पूर्ण करण्यासाठी उल्हासनगरचं मल्टिप्लेक्स गाठावं लागलं

| Updated on: Nov 08, 2021 | 11:06 AM

अनिल अशोक मल्टिप्लेक्समध्ये येऊन रोहित शेट्टी यांनी आशिष चंचलानी, तसंच चित्रपटगृहाच्या कर्मचारी आणि प्रेक्षकांची भेट घेतली. रोहित शेट्टी आल्याचं समजताच नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

रोहित शेट्टीने असं कोणतं वचन दिलं, जे पूर्ण करण्यासाठी उल्हासनगरचं मल्टिप्लेक्स गाठावं लागलं
उल्हासनगरमध्ये रोहित शेट्टी
Follow us on

उल्हासनगर : सिनेमागृह पुन्हा उघडली असून हळूहळू प्रेक्षकांची पावलंही चित्रपट पाहण्यासाठी वळताना दिसत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही रसिकांची गर्दी खेचत आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी रविवारी अचानक उल्हासनगरमधील अनिल अशोक मल्टिप्लेक्समध्ये आले होते. बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने उल्हासनगर शहरातील एका मल्टिप्लेक्सला हजेरी लावण्यामागे कारण ठरलं एक वचन.

युट्यूब स्टार आशिष चंचलानीचं थिएटर

रोहित शेट्टी उल्हासनगरात आल्याचं समजताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. युट्यूब स्टार आशिष चंचलानी यांचं उल्हासनगरात अनिल अशोक मल्टीप्लेक्स हे चित्रपटगृह आहे. आशिषला रोहित शेट्टी यांनी उल्हासनगरमध्ये भेटण्यासाठी येण्याचं वचन दिलं होतं. सध्या रिलीज झालेल्या चित्रपटाच्या निमित्तानं रोहित शेट्टी यांनी हे वचन पूर्ण केलं.

अनिल अशोक मल्टिप्लेक्समध्ये येऊन रोहित शेट्टी यांनी आशिष चंचलानी, तसंच चित्रपटगृहाच्या कर्मचारी आणि प्रेक्षकांची भेट घेतली. रोहित शेट्टी आल्याचं समजताच नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यालाही भेट

तिथून निघून रोहित शेट्टी हे थेट उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाले. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रोहित यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. तर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही रोहित यांचं स्वागत केलं.

पोलिसांकडून रोहित शेट्टीला गुलाबपुष्पं

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात नेहमीच पोलिसांची सकारात्मक दाखवत भूमिका दाखवली जाते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना भेटून विशेष आनंद व्यक्त केला. सूर्यवंशी हा कोरोना काळानंतर चित्रपटगृह उघडल्यावर रिलीज झालेला पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे आता यापुढे सारं काही व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा यावेळी रोहित शेट्टी यांनी व्यक्त केली.

75 कोटींचा टप्पा पार

सुर्यवंशी चित्रपटाने तीन दिवसात 75 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील कमाई धरुन पहिल्याच वीकेंडला सुर्यवंशीने 77.24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

पंजाबमध्ये अक्षय कुमारच्या सूर्यवंशीला विरोध, किसान मोर्चाचं आक्रमक रुप, शो बंद पाडले

Sooryavanshi : बॉक्स ऑफिसवर अक्षय आणि कतरिनाच्या चित्रपटाचा धमाका, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी रुपये