AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये अक्षय कुमारच्या सूर्यवंशीला विरोध, किसान मोर्चाचं आक्रमक रुप, शो बंद पाडले

अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट देशभरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. मात्र, पंजाबमध्ये या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. यामुळे निर्मात्यांच्या अडचणी वाढू शकतात. सूर्यवंशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

पंजाबमध्ये अक्षय कुमारच्या सूर्यवंशीला विरोध, किसान मोर्चाचं आक्रमक रुप, शो बंद पाडले
सूर्यवंशी चित्रपट
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 12:21 PM
Share

मुंबई : अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट देशभरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. मात्र, पंजाबमध्ये या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. यामुळे निर्मात्यांच्या अडचणी वाढू शकतात. सूर्यवंशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पंजाबच्या शेतकरी संघटनेने या चित्रपटाला विरोध सुरू केला आहे. बॉयकॉट सूर्यवंशीचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे.

पंजाबच्या अनेक भागात शेतकरी संघटनेने हा चित्रपट चित्रपटगृहात चालू दिला नाहीये.वृत्तानुसार, पंजाबमधील बुडलाढा येथील दोन चित्रपटगृहांनी शो न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आंदोलक त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करू शकतात. चित्रपट चालवला तर त्यांना विरोधाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती आहे. पंजाबच्या अनेक भागात निदर्शने सुरू असून ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या किसान मोर्चाने या चित्रपटावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या जवळीकतेमुळे चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा विरोध आणखी वाढणार असल्याचेही बोलले जात आहे.रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’बद्दलचे तेच आश्वासन पूर्ण केले. या चित्रपटाने प्रचंड गर्दी केली यात नवल नाही. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत.

अक्षय कुमारने ‘सूर्यवंशी’ रिलीज होण्यापूर्वी चित्रपटातील एक स्लिट शेअर करताना सांगितले होते की, हा अॅक्शन चित्रपट खूप खास आहे. तो म्हणाला, मी माझ्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. ज्यात हेलिकॉप्टर, इमारतीवरून उडी मारणे, बाइक पकडणे. सूर्यवंशी माझ्यासाठी अनेक बाबतीत खूप खास आहेत. माझ्यासाठी ही एक जुनी शाळा आहे. मात्र, जर पंजाबमधून चित्रपटाला असाच विरोध होत राहिला तर निर्मात्यांच्या अडचणी  वाढू शकतात.

संबंधित बातम्या : 

तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यन खान काय वाचतोय?; स्वीडिश लेखकाचं हे पुस्तक माहीत आहे काय?

Major | ‘देशाला सांभाळणं सैनिकाची जबाबदारी आहे!’, पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा सांगणारा ‘मेजर’चा जबरदस्त टीझर!

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

(Opposition to Akshay Kumar’s Suryavanshi film in Punjab)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.