Sooryavanshi Releas | अक्षय आणि कतरिनाच्या चाहत्यांना धक्का, सूर्यवंशीच्या निर्मात्यांनी केला मोठा खुलासा!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sooryavanshi Releas | अक्षय आणि कतरिनाच्या चाहत्यांना धक्का, सूर्यवंशीच्या निर्मात्यांनी केला मोठा खुलासा!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सूर्यवंशी चित्रपट 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत होते. याबद्दल आता रिलायन्स एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशिष सरकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sooryavanshi movie The makers made a big revelation)

चित्रपटासंदर्भात शिबाशिष सरकार म्हणतात की “चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.” पण रोहित शेट्टी आणि मला असं वाटत आहे की, काही जन या चित्रपटाचे निर्माते बनले आहेत आणि चित्रपटाविषयी आपली वेगवेगळी विधाने देत आहेत. सूर्यवंशी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्साह आहे. जिथे प्रत्येकाला या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफला सोबत काम करताना बघायचे आहे. सूर्यवंशी चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. जावेद जाफरी, जॅकी श्रॉफ सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमारसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

कदाचित लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल. चित्रपटाचे टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाले होते. 24 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

संंबंधित बातम्या : 

आईशिवायची पोर, बापही दूर, बॉयफ्रेंडही गमावला, दु:खाचा डोंगर कोसळला, मग संजय दत्तच्या मुलीनं काय केलं? एक प्रेरणादायी बातमी

अथिया शेट्टीचा हॉट अंदाज, केएल राहुल क्लिन बोल्ड; वाचा कमेंट!

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(Sooryavanshi movie The makers made a big revelation)

Published On - 5:52 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI