अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt)  डिसेंबर महिन्यात मुंबईच्या वांद्रे भागात त्यांची पत्नी मान्यता हिला चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 03, 2021 | 7:41 PM

मुंबई : अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt)  डिसेंबर महिन्यात मुंबईच्या वांद्रे भागात त्यांची पत्नी मान्यता हिला चार फ्लॅट गिफ्ट म्हणून दिले. ज्यांचे बाजार किंमत सुमारे 100 कोटी असल्याचे म्हटले जाते. पण एका आठवड्यातच तिने हे गिफ्ट परत केले. गिफ्ट डीडनुसार, या चार मालमत्तांसाठी 26.5 कोटी रुपये हा सर्कल रेट किंवा सरकारने ठरविलेले मूल्य आहे, परंतु युनिटचे बाजार मूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचे ब्रोकर्सचे म्हणणे आहे. हे चार अपार्टमेंट्स पाली हिल्समधील इम्पीरियल हाइट्स इमारतीत आहेत, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांची घरे याच परिसरात आहेत. (Sanjay Dutt Gifted 100 Crore property Flat To Manyata She returned gift in just 6 Days)

दोन अपार्टमेंट तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील आहेत आणि 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर एक पेन्टहाउस आहे. झॅपकी डॉट कॉम ही साईट सार्वजनिकपणे उपलब्ध मालमत्ता नोंदणी डेटा एकत्रित आणि संयोजित करते. त्यानुसार चेक केलं असता यावर ही अपार्टमेन्टसची माहिती दाखवली गेली आहे. त्यांच्याकडे यासंबंधीची नोंदणीकृत कागदपत्रे आहेत.

23 डिसेंबरला दिलं होतं गिफ्ट

एका अहवालानुसार संजय दत्तने 23 डिसेंबर 2020 रोजी पत्नी मान्यताला हे गिफ्ट दिलं होत. आश्चर्यकारक गोष्ट अशी की मान्यताने हे गिफ्ट 29 डिसेंबरला परत केले. जर एखादा करदाता त्याच्या कुटुंबातील एखाद्याला एखादी संपत्ती गिफ्ट म्हणून देतो तर मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, गिफ्ट करणे साधारणपणे केले जात नाही. हे शक्य आहे की हे कर वाचवण्यासाठी केले गेले असेल.

मागील वर्षी संजय दत्तला कोरोनाने गाठलं

मागील वर्षी संजय दत्त कर्करोगाचा शिकार होता. त्यांच्यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोगाचा चौथा टप्पा आढळला. त्यावेळी माझा कठीण काळ सुरु असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र योग्य उपचारानंतर सुदैवाने त्याने कर्करोगावर मात केली.

संबंधित बातम्या : 

शाहरुख-सलमान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, भाईजानची पठाण चित्रपटात एन्ट्री!

Bhool Bhulaiya 2 | ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

(Sanjay Dutt Gifted 100 Crore property Flat To Manyata She returned gift in just 6 Days)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें