शाहरुख-सलमान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, भाईजानची पठाण चित्रपटात एन्ट्री!

शाहरुख-सलमान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, भाईजानची पठाण चित्रपटात एन्ट्री!

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 03, 2021 | 4:24 PM

मुंबई : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. आता या चित्रपटासंदर्भात आणखीन एक मोठी बातमी पुढे येत आहे. या चित्रपटासोबत अजून एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. (Shahrukh Khan and Salman Khan will be seen together in the movie Pathan)

अभिनेता सलमान खान देखील चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार सलमान खान ‘पठाण’ च्या कलाकारांमध्ये सामील होणार आहे. तो पठाण चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये करणार असून सलमान खान चित्रपटाचे 15 दिवस शूट करणार आहे. मार्चमध्ये टायगर 3 चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी तो पठाणचे शूट पूर्ण करेल. सलमान पठाण चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणी सुरू आहे. बुर्ज खलिफा तेथे मार्चमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आनंद आणि आदित्य चोप्रा यांच्या या चित्रपटात शाहरुख खान अ‍ॅक्शन सिन करताना दिसणार आहेत.या चित्रपटाचा सेटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओंमध्ये शाहरुख एका फिरत्या ट्रकच्या वर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसत होता.

दीपिका पादुकोणने मुंबईत या चित्रपटाचा सिक्वेन्स शूट केला होता आणि आता लवकरच जॉन अब्राहम आणि शाहरुख यांच्यात अ‍ॅक्शन शूट करतील. मात्र, जॉन अब्राहमला पठाण चित्रपटाचे शूट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. जॉन अब्राहम सध्या दिल्लीत आहे.  मुंबईत त्याने आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. जॉनसाठी, 2018-2019 हे एक अतिशय चांगले गेले कारण त्याचे 2 मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

संंबंधित बातम्या : 

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

Accident | शूटिंग सुरू होताच ‘आदिपुरुष’ च्या सेटवर दुर्घटना!

Bhool Bhulaiya 2 | ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

(Shahrukh Khan and Salman Khan will be seen together in the movie Pathan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें