AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident | शूटिंग सुरू होताच ‘आदिपुरुष’ च्या सेटवर दुर्घटना!

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे.

Accident | शूटिंग सुरू होताच 'आदिपुरुष' च्या सेटवर दुर्घटना!
| Updated on: Feb 03, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्‍याच वादांनंतर चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. मात्र, शूटिंग दरम्यानच शेटवर आग लागली होती. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. मात्र, या आगीमध्ये क्रोमा सेट जळून खाक झाला. (While the shooting was going on, a fire broke out on the set of the movie ‘Adipurush’)

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

दिग्दर्शक ओम राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम सुरक्षित आहेत. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी शेटवर प्रभास आणि सैफ शूटवर नव्हते. आग लागल्यानंतर काही मिनिटांतचअग्निशमन दलाने येऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने ट्वीटद्वारे मोशन कॅप्चर सुरू झाल्याची माहिती दिली होती. त्याने एक फोटो शेअर होता आणि लिहिले होते की, मोशन कॅप्चर सुरू झाले.

आदिपुरुषचे जग तयार करत आहोत. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणाले म्हणाले होते की, टी-सीरीजमध्ये आम्ही नेहमीच नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देतो. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आदिपुरुषची सुरूवात करेल, तर सैफ अली खानदेखील मार्चमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

आदिपुरुष चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कोण काम करणार आहे हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मेकर्स लवकरच चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट भूषण कुमार निर्मित करीत असून चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Bhool Bhulaiya 2 | ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

(While the shooting was going on, a fire broke out on the set of the movie ‘Adipurush’)

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.