आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट ओटीटीवर झळकणार!

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या (Sanjay Leela Bhansali) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 03, 2021 | 2:01 PM

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या (Sanjay Leela Bhansali) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाविषयी एक महत्वाची बातमी पुढे येत आहे. आता या चित्रपटाचे डिजिटल राइट्स ओटीटी प्लेटफॉर्मला विकण्यात आले असल्याची बातमी आहे. चित्रपटाचे राइट्स  नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. मात्र, हे राइट्स विकत घेण्यासाठी नेटफ्लिक्सने मोठी रक्कम दिल्याचे बोलले जात आहे. नेटफ्लिक्स 70 कोटींमध्ये रूपये दिले असल्याचे माहिती आहे. मात्र, अद्याप तशी घोषणा करण्यात आली नाही. (Alia Bhatt’s movie ‘Gangubai Kathiawadi’ will be seen on Netflix)

हा चित्रपट हुसेन जैदी (Hussain Zaidi) यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. गंगूबाईच्या कुटुंबियांनी 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला होता. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी चित्रपटाबद्दल काही आक्षेप घेतले होते.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गांगुबाई ह्या तिच्या पतीकडून केवळ 500 रुपयांत विकली होती. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात गुंतली. यावेळी तिने अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

संबंधित बातम्या : 

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

आधी लव्ह, लव्ह, लव्ह नंतर लग्नही केलं पण मग मोडलं का? सुशील ,संस्कारी टीव्ही सुनांचं वास्तवादी आयुष्य !

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

(Alia Bhatt’s movie ‘Gangubai Kathiawadi’ will be seen on Netflix)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें