AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’ चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेबाबत सुपरस्टार यशने केला मोठा खुलासा, म्हणाला….

निर्माता नितेश तिवारी याच्या 'रामायण' या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलियाच्या नावावरून देखील गोंधळ सुरू आहे.

'रामायण' चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेबाबत सुपरस्टार यशने केला मोठा खुलासा, म्हणाला....
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 22, 2023 | 8:34 PM
Share

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता यश हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटातून तो चांगलाच फेमस झाला होता. त्याचं रॉकी भाई हे पात्र मोठ्या प्रमाणात गाजलं आहे. तसंच त्याचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला आहे.  यशचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे.

आता यशच्या नवीन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्माता नितेश तिवारी याच्या ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलियाच्या नावावरून देखील गोंधळ सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपटात रावणची भूमिका यश साकारणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. याबाबत आता स्वत: यशनं स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यश आणि त्याची पत्नी राधिका मुलांसह त्याच्या गावी म्हैसूरला गेला होता. यावेळी त्यानं कुटुंबासह नंजुंदेश्वर मंदिराला भेट दिली. यादरम्यान यशनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना यशनं त्याच्या आगामी ‘यश 19’ या चित्रपटाबाबत सांगितलं. तो म्हणाला की, चाहते त्यांच्या मेहनतीच्या पैशातून चित्रपट पाहतात. मला त्यांच्या पैशांची कदर आहे. आम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करत आहोत कारण चित्रपट हे संपूर्ण देशच नाही तर जगही पाहत आहे. त्यामुळे मला या जबाबदारीची जाणीव आहे. आम्ही खूप मेहनत घेत आहोत आणि आम्ही जे मिळून काम करत आहोत त्यावर प्रत्येकजण खुश होईल.

दरम्यान, यशने रामायणातील रावणाच्या पात्राच्या ऑफरबाबतही उघडणे सांगितलं. तो म्हणाला की, तो भूमिका मिळवण्यासाठी कोणाकडे  गेला नसून त्याच्या कामामुळे प्रत्येकाला त्याच्याकडे ती भूमिका आली असून लवकरच याबाबत मोठी घोषणा करणार असल्याचं जय म्हणाला.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....