Srinidhi Shetty: ‘KGF: चाप्टर 2’च्या यशानंतर श्रीनिधी शेट्टीनं वाढवलं माधन; ‘कोब्रा’साठी मागितली इतकी फी

साऊथचा सुपरस्टार विक्रम या चित्रपटात श्रीनिधीसोबत काम करणार आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आर. अजय ज्ञानमुथू यांनी केलं आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात क्रिकेटर इरफान पठाणही दिसणार आहे.

Srinidhi Shetty: 'KGF: चाप्टर 2'च्या यशानंतर श्रीनिधी शेट्टीनं वाढवलं माधन; 'कोब्रा'साठी मागितली इतकी फी
'KGF: चाप्टर 2'च्या यशानंतर श्रीनिधी शेट्टीनं वाढवलं माधनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:27 AM

अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. त्यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. रॉकी भाईच्या ‘केजीएफ चाप्टर 1’ आणि चाप्टर 2 (KGF) या दोन्हीमध्ये अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने (Srinidhi Shetty) त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटामुळे श्रीनिधी जगभरात लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेमुळे श्रीनिधीने तिचं मानधन वाढवल्याचं कळतंय. ‘KGF 2’च्या यशानंतर श्रीनिधी शेट्टीने तिची फी वाढवली आहे. ती लवकरच ‘कोब्रा’ (Cobra) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी तिने दुप्पट फीची मागणी केली आहे.

श्रीनिधीने प्रशांत नील दिग्दर्शित ‘KGF चाप्टर 2’साठी तीन कोटी रुपये मानधन घेतलं होतं. आता तिने तिच्या आगामी ‘कोब्रा’ चित्रपटासाठी 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. श्रीनिधी KGF च्या तुलनेत दुप्पट मानधन स्वीकारत आहे. साऊथचा सुपरस्टार विक्रम या चित्रपटात श्रीनिधीसोबत काम करणार आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आर. अजय ज्ञानमुथू यांनी केलं आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात क्रिकेटर इरफान पठाणही दिसणार आहे. कोब्रा यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

KGF Chapter 2 च्या कथेत चाहत्यांनी पाहिलं की रीना देसाईला (श्रीनिधी शेट्टी) गोळी मारली जाते आणि तिचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत ती केजीएफच्या तिसर्‍या भागात दिसणार नसल्याचं मानलं जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. श्रीनिधीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. 2016 मध्ये तिने मिस सुप्रानॅशनल या सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकला. त्यानंतर तिने कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये तिने केजीएफ चाप्टर 1 या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.